मुंबई : पूजा चव्हाण प्रकरणात नाव आल्यानंतर अखेर शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांना वनमंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागलं. 3 दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला. मात्र, संजय राठोड हे अद्यापही मंत्रिपदावर आहेत, असं भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटलंय. कारण, राठोड यांनी राजीनामा दिला असला तर तो मुख्यमंत्र्यांनी अद्याप राज्यपालांकडे पाठवला नाही, असा दावा वाघ यांनी केलाय.(Chitra Wagh criticizes CM Uddhav Thackeray over Sanjay Rathore’s resignation)
“मा. मुख्यमंत्रीजी, संजय राठोड यांचा राजीनामा घेऊन 3 दिवस झाले पण तो राज्यपालांकडे पाठवलेला नाही. राजीनामा राज्यपालांकडे जाऊन मंजूर होत नाही तोवर संजय राठोड आजही मंत्री आहेत. ही राज्यातील जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणं आहे. या संदर्भात “वाण नाही पण गुण लागला” हे तुमच्याबाबत होऊ देऊ नका” असं ट्वीट संजय राठोड यांनी केलंय.
मा.मुख्यमंत्री जी
संजय राठोड चा राजीनामा घेऊन ३ दिवस झाले पण तो राज्यपालांकडे पाठवलेला नाही
राजीनामा राज्यपालांकडे जाऊन मंजूर होत नाही तोवर संजय राठोड आज ही मंत्री आहेचं..ही राज्यातील जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणे झाले
या संदर्भात”वाण नाही पण गुण लागला”हे तुमच्याबाबतीत होऊ देऊ नका pic.twitter.com/copfCeWEKn— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) March 3, 2021
संजय राठोड यांनी वन मंत्रीपदाचा राजीनामा देऊन तीन दिवस उलटले तरी राठोड यांचा अद्याप राज्यपालांकडे पाठवण्यात आलेला नाही. त्यावरून भाजप आमदार संजय कुटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. राठोडांचा राजीनामा फक्त दिखाव्यापुरता आहे का? राठोडांचा राजीनामा शिवसेना भवन किंवा मातोश्रीत फ्रेम करून ठेवला आहे का? असा खोचक सवाल संजय कुटे यांनी केला आहे.
जोपर्यंत राठोडांचा राजीनामा राज्यपाल मंजूर करत नाहीत, तोपर्यंत राठोडांनी राजीनामा दिला असं म्हणता येणार नाही, असं सांगतानाच राजीनामा राठोडांकडे पाठवण्यासाठी इतके दिवस का लागत आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्वरीत हा राजीनामा राज्यपालांकडे पाठवावा. त्यांचा राजीनामा मातोश्री किंवा शिवेसना भवनात फ्रेम करून ठेवला आहे का? असा सवाल कुटे यांनी केला.
संबंधित बातम्या :
‘राजीनामा तुमच्याकडेच ठेवा, राज्यपालांकडे पाठवू नका’, राठोडांचं अजुनही मुख्यमंत्र्यांवर दबावतंत्र
संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर; सीएम म्हणतात, तो काय फ्रेम करुन ठेवण्यासाठी नाही!
Chitra Wagh criticizes CM Uddhav Thackeray over Sanjay Rathore’s resignation