संजय राऊतांची उच्च प्रतीच्या गांजाची नशा अजून उतरली नाही का? पैठणच्या सामूहिक बलात्कार प्रकरणावरुन चित्रा वाघ कडाडल्या
भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आज पीडित महिलांची भेट घेत, त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. यावेळी चित्रा वाघ यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.
औरंगाबाद : पैठण तालुक्यातील तोंडाळी गावातील शेतवस्तीवर बुधवारी मध्यरात्री दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. दरोडेखोरांनी वस्तीवर केवळ लूट केली नाही तर दोन महिलांवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केलाय. मात्र, त्यांना अद्याप आरोपींचा तपास करण्यात यश मिळालेलं नाही. अशावेळी भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आज पीडित महिलांची भेट घेत, त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. यावेळी चित्रा वाघ यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. (Chitra Wagh criticizes Sanjay Raut and Mahavikas Aghadi government over gang rape case in Paithan)
संजय राऊत यांची उच्च प्रतीच्या गांजाची नशा अजून उतरली नाही का? औरंगाबादत्या बलात्काराच्या घटनेवर संजय राऊत यांनी एक शब्दही काढला नाही, अशी खोचक टीका चित्रा वाघ यांनी केलीय. राज्यात रोज महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. संजय राऊत नेहमी टीका करतात. त्यांची गांजाची नशा अद्याप उतरली नाही. राज्यात एकही जिल्हा असा नाही जिथे महिलांचे शोषण होत नाही. नवीन कायदा कधी येणार माहिती नाही, कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये महिला सुरक्षेचा मुद्दा आहे का? असा सवाल चित्रा वाघ यांनी केलाय. पैठण तालुक्यातील पीडित महिलांना सरकार योजनांचा फायदा होईल त्याबाबत पावलं उचलावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केलीय.
औरंगाबाद पैठणतालुका तोंडोळी गावच्या घटनेवरून आपण निजामाच्या राजवटीत राहतोय का हा प्रश्न पडलाय
ओल्या बाळंतीणवर बलात्कार.. गर्भवतीवर अत्याचार.. दरोडेखोर मोकाट.. उरला नाही कायद्याचा धाक..
‘शिवशाही’चं वचन देणा-यांनी ‘निजामशाही’ आणलीय @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra pic.twitter.com/L0v1uJdJun
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 21, 2021
आरोपींना कायद्याची भीती का वाटत नाही?
कायद्याचा वचक, भीती अत्याचार करणाऱ्यांना का वाटत नाही? नेत्यांवरच महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत. मग संजय राठोड असो की मेहबूब शेख. यांचं काही होत नाही मग आमचं काय होणार? असं आरोपींना वाटत आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. त्यात लहान मुलींवर अत्याचाराच्या घटनांमध्येही मोठी वाढ होत असल्याबाबत चित्रा वाघ यांनी चिंता व्यक्त केलीय.
१५ दिवसाची बाळांतीण आणि ८ महिन्याच्या गर्भवतीवर बलात्कार झालाय.. अन् संजय राऊतांची लेखणी महिला संरक्षणाऐवजी भ्रष्टाचा-यांच्या रक्षणासाठी परजतेय… कदाचित..उच्च प्रतीच्या गांजाची नशा अजून उतरली नसल्यानं संजय राऊत यांच्या पर्यंत औरंगाबाद महिला अत्याचाराची घटना पोहोचली नसेल..
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 21, 2021
‘यांचे गृहमंत्री फरार होतात, मग आरोपी कसे सापडतील?’
शक्ती कायदा आणला जाणार होता, त्याचं काय झालं? शक्ती नेमकी कुणाला देत आहात? महिलांना की आरोपींना? मेहबूब शेख प्रकरणात पोलिसांनी असा अहवाल कसा दिला, त्यावर कोर्टानं ताशेरे ओढले आहेत. पैठण इथली घटना अतीशय निंदनीय आहे. राज्यात महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. अत्याचारग्रस्त कुटुंबियांना तातडीची मदत केली पाहिजेय शिवशाहीचे वचन देणाऱ्यांनी निजामशाही आणली आहे. राज्यात मोगलाई सुरु आहे. यांचे गृहमंत्री फरार होतात तर हे आरोपी कसे सापडतील, अशी खोचक टीका वाघ यांनी केलीय.
इतर बातम्या :
गुहागर नगराध्यक्षांचा समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश, विकासासाठी अजित पवारांचा शब्द
समीर वानखेडेला वर्षभरात तुरुंगात टाकणार, नवाब मलिकांचा जाहीर कार्यक्रमात इशारा
Chitra Wagh criticizes Sanjay Raut and Mahavikas Aghadi government over gang rape case in Paithan