काल काही फुटले, आज तेरा गेले यालाच म्हणतात तीन तेरा वाजले; चित्रा वाघ यांचा शिवसेनेवर निशाणा

चित्रा वाघ यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. काल काही गेले, आज पुन्हा तेरा गेले यालाच तीन तेरा वाजणे असे म्हणतात असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

काल काही फुटले, आज तेरा गेले यालाच म्हणतात तीन तेरा वाजले; चित्रा वाघ यांचा शिवसेनेवर निशाणा
चित्रा वाघ Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 2:09 PM

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे कालपासून नॉटरिचेबल होते. ते आज सुरतमध्ये असल्याचे समोर आले आहे.  एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे 35 आमदार असल्याचा दावा भाजपाच्या वतीने करण्यात येत आहे. दरम्यान आता शिवसेनेकडून (shivsena) एकनाथ शिंदे यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू असून, माजी मंत्री संजय राठोड (Sanjay Rathore) हे मध्यस्थी करण्यासाठी सुरतला जाणार आहेत. आता या सर्व घडामोडींवर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी खोचक ट्विट केले आहे. विधान परिषद निवडणुकीमध्ये काही फुटले, आज तेरा गेले यालाच तीन तेरा वाजणे असे म्हणतात असं ट्विट चित्रा वाघ यांनी केले आहे. चित्रा वाघ यांच्यापूर्वी भाजप नेते अनिल बोंडे यांनी देखील याच मुद्द्यावरून शिवसेनेवर टीका केली होती.

हे सुद्धा वाचा

काय म्हटले होते अनिल बोंडे यांनी?

अनिल बोंडे यांनी शिवसेनेसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा  साधला होता. उद्धव ठाकरे यांचे त्यांच्याच पक्षावर नियंत्रण नसल्याचे बोंडे यांनी म्हटले होते. उद्धव ठाकरे यांना आमदारांवर नियंत्रण ठेवता येत नाही. महाविकास आघडाीमधील घटक पक्षांवर देखील त्यांचे नियंत्रण नसल्याचे बोंडे यांनी म्हटले होते. एकनाथ शिंदे यांनी वेळोवेळी आपली निष्ठा सिद्ध केली आहे. तरी देखील त्यांच्यावर संशय घेण्यात आला. आता हाच संशय शिवसेनेला भोवण्याची शक्यता असल्याचे बोंडे म्हणाले होते.

संजय राठोड करणार मध्यस्थी

शिवसेना नेते आणि माजी मंत्री संजय राठोड हे आता मध्यस्थी करण्यासाठी सुरतला जाणार आहेत. ते एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. मध्यस्थी यशस्वी झाल्यास काही प्रश्नच नाही. मात्र मध्यस्थी होऊ न शकल्यास एकनाथ शिंदे हे आज रात्री आपला निर्णय जाहीर करणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्याबाबतीत दोन शक्यता वर्तवण्यात येत आहेत. एक म्हणजे ते भाजपामध्ये प्रवेश करणार किंवा नव्या पक्षाची घोषणा करणार. दरम्यान सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावे आणि मी उपमुख्यमंत्री बनावण अशी इच्छा देखील शिंदे यांनी व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.