Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chitra Wagh : चित्रा वाघ पुन्हा अडचणीत, बलात्काराची खोटी तक्रार द्यायला लावली, मेहबूब शेख प्रकरणात पीडितेचा सनसनाटी दावा

राष्ट्रवादी नेते मेहबूब शेख यांच्यावर झालेल्या बलात्कार आरोप प्रकरणाने आता वेगळ वळणं घेतलं आहे. चित्रा वाघ यांनी खोटी तक्रार द्यायला लावल्याचा आरोप पीडितेने केला आहे. चित्रा वाघ यांच्यावर याआधीही असे आरोप झाले आहेत.

Chitra Wagh : चित्रा वाघ पुन्हा अडचणीत, बलात्काराची खोटी तक्रार द्यायला लावली, मेहबूब शेख प्रकरणात पीडितेचा सनसनाटी दावा
चित्रा वाघ Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 18, 2022 | 9:14 PM

मुंबई : भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) या पुन्हा एकदा अडचणीत आल्या आहेत. कारण एका बलात्कार पीडितेने चित्रा वाघ यांनी खोटी बलात्काराची (Rape Case) तक्रार द्यायला लावल्याचा सनसनाटी आरोप केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी नेते मेहबूब शेख (Mehboob Shaikh) यांच्यावर झालेल्या बलात्कार आरोप प्रकरणाने आता वेगळ वळणं घेतलं आहे. चित्रा वाघ यांच्यावर याआधीही असे आरोप झाले आहेत. आत्ता पुन्हा असेच आरोप झाल्याने ऐन विधान परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ माजली आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते रघुनाथ कुचिक आरोप प्रकरणात असेच आरोप पीडितेने चित्रा वाघ यांच्यावर केले होते. तेव्हाही बराच राजकीय वादंग झाला होता. आत्ताही या आरोपांनंतर पुन्हा नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

सुरेश धस यांचाही सहभाग असल्याचा दावा

या दबाव प्रकरणात फक्त चित्रा वाघच नाही तर भाजप आमदार सुरेध धस यांचाही सहभाग असल्याचा आरोप या पीडितेकडून करण्यात आला आहे. तशी तक्रार या पीडितेने दाखल केली आहे. चित्रा वाघ यांनी मीडियाशी कसे बोलायचे हे शिकवले, तर धस यांनी जे लिहून दिलं ते मीडियासमोर बोलले, असा आरोप या तरुणीने केला आहे. त्यामुळे आता चित्रा वाघ यांच्यासोबतच सुरेश धस यांच्याही अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे. या प्रकरणात फक्त तक्रार दाखल आहे, गुन्हा दाखल झालेला नाही, या प्रकरणी संबंधित तरुणीच्या तक्रारीवरून मालेगाव येथील नगरसेवक नदीम याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडितेने घुमजाव केल्याचा वाघ यांचा आरोप

मेहबूब शेख यांच्यावर काय आरोप होते?

या प्रकरणातील पीडिता ही खासगी क्लासेस घेत होती. मात्र मेहबूब शेख यांनी तिला नोकरीचे अमिष दाखवलं, असा आरोप तिने आधी केला होता. शेख यांनी एक ठिकाणी बोलवून गाडीत तिच्यावर अत्याचार केला. तसेच हे प्रकरण कुणाला सांगितलं तर तुला सोडणार नाही, अशी धडकी दिली, असा सनसनाटी आरोप काही महिन्यांपूर्वी या पीडितेने शेख यांच्यावर केले होते. त्यानंतर आता या प्रकरणात हे नवं ट्विस्ट आलंय. मेहबूब शेख हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष आहेत.

तक्रार दाखल करण्यामागचं कारण काय?

हे सर्व सुरेश धस यांच्या सागण्यावरून झालं आहे, अशी तक्रार आता पीडितेने दिली आहे. नदमोद्दीन शेख नावाच्या वक्तीला धस यांनी मेहबूब शेख यांना एखाद्या प्रकरणात अडकवं असे सांगितले होते. त्यानंतर नदमोद्दीन शेख याने मला लग्नाचे अमिष दाखवू माझ्यावर अत्याचार केला आणि त्याचे व्हिडिओ शुटिंगही केले. ते व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने मला खोटी तक्रार द्यायला लावली. तर त्यानंतर या नदमोद्दीन शेख यानेच पीडितेला चित्रा वाघ यांच्याकडे नेले. त्यावेळी आता जर तु तक्रार मागे घेतली तर तुझ्याच अडचणी वाढतील. तुलाच पोलीस अटक करतील, असे चित्रा वाघ यांनी धमकावल्याचे तरुणीने आपल्या आरोपात म्हटले आहे.

चिमुकलीवर लैंगिक अत्याचार अन् खिडकीतून खाली... मुंब्र्यात काय घडलं?
चिमुकलीवर लैंगिक अत्याचार अन् खिडकीतून खाली... मुंब्र्यात काय घडलं?.
कुणाल कामराच्या सुनावणीदरम्यान नेमकं काय घडलं? इनसाईड स्टोरी
कुणाल कामराच्या सुनावणीदरम्यान नेमकं काय घडलं? इनसाईड स्टोरी.
लाडक्या बहिणींनो जरा जपून, 65 महिलांच्या नावावर 20 लाखांचं कर्ज
लाडक्या बहिणींनो जरा जपून, 65 महिलांच्या नावावर 20 लाखांचं कर्ज.
लाडक्या बहिणींनो एप्रिलच्या हफ्त्याची वाट पाहताय? कधी येणार पैसे?
लाडक्या बहिणींनो एप्रिलच्या हफ्त्याची वाट पाहताय? कधी येणार पैसे?.
ट्रम्प यांचं टेरिफ धोरण; भारत-चीनचे संबंध सुधरतील?
ट्रम्प यांचं टेरिफ धोरण; भारत-चीनचे संबंध सुधरतील?.
एका हातात मोबाईल अन् दुसऱ्या हातात स्टेअरिंग... बस चालकाचा बघा प्रताप
एका हातात मोबाईल अन् दुसऱ्या हातात स्टेअरिंग... बस चालकाचा बघा प्रताप.
मनसेची मान्यता रद्द करण्याची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल
मनसेची मान्यता रद्द करण्याची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल.
स्मृती इराणी यांनी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरवं, सिलेंडर आम्ही पुरवू
स्मृती इराणी यांनी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरवं, सिलेंडर आम्ही पुरवू.
टीव्ही 9च्या उपक्रमाचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक
टीव्ही 9च्या उपक्रमाचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक.
लाडक्या बहिणींची पात्रता पडताळणी ठप्प
लाडक्या बहिणींची पात्रता पडताळणी ठप्प.