Chitra Wagh : ‘तुझं चामडं सांभाळ, ते कुठल्याही क्षणी सोलण्याची व्यवस्था आहे’, चित्रा वाघांचा मेहबुब शेख यांना इशारा

| Updated on: Apr 12, 2022 | 5:19 PM

लाचखोरी रक्तात भिनलेल्या विचित्र लाचखोर महिला नेत्यांकडून वेगळी काय अपेक्षा करणार? असा खोचक सवाल मेहबुब शेख यांनी केलाय. शेख यांच्या या टीकेबाबत पत्रकारांनी विचारलं असता 'त्याला म्हणावं तुझं चामडं सांभाळ. ते कुठल्याही क्षणी सोलण्याची व्यवस्था आहे', अशा शब्दात चित्रा वाघ यांनी इशारा दिलाय.

Chitra Wagh : तुझं चामडं सांभाळ, ते कुठल्याही क्षणी सोलण्याची व्यवस्था आहे, चित्रा वाघांचा मेहबुब शेख यांना इशारा
चित्रा वाघ यांचा मेहबुब शेख यांना इशारा
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) प्रकरणाला आता वेगळं आणि नाट्यमय वळण मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. या प्रकरणातील पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी लढणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावरच पीडितेनं गंभीर आरोप केले आहेत. आपल्याला गोव्यात तसंच मुंबईत चित्रा वाघ यांच्या मदतीनं डांबून ठेवलं. पोलिसांना विशिष्ट जबाब देण्यास वाघ यांनीच सांगितल्याचा गंभीर आरोप पीडित तरुणीने केलाय. पीडितेच्या या आरोपानंतर आता चित्रा वाघ यांच्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख (Mehboob Shaikh) यांनी जोरदार टीका केलीय. लाचखोरी रक्तात भिनलेल्या विचित्र लाचखोर महिला नेत्यांकडून वेगळी काय अपेक्षा करणार? असा खोचक सवाल मेहबुब शेख यांनी केलाय. शेख यांच्या या टीकेबाबत पत्रकारांनी विचारलं असता ‘त्याला म्हणावं तुझं चामडं सांभाळ. ते कुठल्याही क्षणी सोलण्याची व्यवस्था आहे’, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी इशारा दिलाय.

मेहबुब शेख यांची चित्रा वाघांवर टीका

रघुनाथ कुचिक प्रकरणातील पीडित तरुणीने केलेल्या आरोपावरुन मेहबुब शेख यांनी चित्रा वाघ यांच्यावर जोरदार टीका केलीय. ‘लाचखोरी रक्तात भिनलेल्या विचित्र लाचखोर महिला नेत्यांकडून वेगळी काय अपेक्षा करणार? महिलांच्या रक्षक म्हणून सांगणाऱ्या स्वत:च महिलांच्या भक्षक आहेत! ही गोष्ट गंभीर आहे. असल्या डबल ढोलकी व्यक्तीवर तत्काळ कारवाई करण्यात आली पाहिजे’ असं ट्वीट मेहबुब शेख यांनी केलं आहे.

मेहबुब शेख यांचं ट्वीट

‘माझ्या नादाला लागण्याचं काम करायचं नाही’

शेख यांच्या टीकेबाबत पत्रकारांनी विचारलं असता चित्रा वाघ संतापल्याचं पाहायला मिळालं. ‘त्याला म्हणावं तुझं चामडं सांभाळ. ते कुठल्याही क्षणी सोलण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे तू ते सांभाळ. हे गंभीर प्रकरण आहे, त्यात बलात्काऱ्यांनी चोमड्यासारखं बोलू नये. आम्ही त्यांच्या विरोधात बोलतोय. फेब्रुवारीपासून ती पोरगी लढतेय तेव्हा हे सगळे झोपले होते, काय म्हणू याला भाई जान.. आता त्याला तिची कड आलीय, जेव्हा ती माझ्या विरोधात बोलली. असे 100 जण तंगड्याला बांधून रोज फिरते चित्रा वाघ, माझ्या नादाला लागण्याचं काम करायचं नाही अजिबात, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी मेहबुब शेख यांना थेट इशाराच दिलाय.

इतर बातम्या : 

Chitra Wagh : रघुनाथ कुचिक प्रकरणात नाट्यमय वळण! पीडित तरुणीचा चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप; चित्राताई म्हणाल्या, आनंद वाटला…

INS Vikrant Case : विक्रांत घोटाळ्यात नाव येताच किरीट सोमय्यांना गोपीनाथ मुंडेंची आठवण; सोमय्या नेमकं काय म्हणाले?