मुख्यमंत्र्यांच्या नांदेडमधील सभेत मेगा भरती, राष्ट्रवादीचे दिग्गज नेते रांगेत

या यात्रेनिमित्ताने नांदेडमध्ये मुख्यमंत्र्याच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय. 30 ऑगस्ट रोजी नवा मोंढा मैदानात ही जाहीर सभा होणार आहे. या सभेमध्ये भाजप प्रवेशाची जंबो भरती आयोजित करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या नांदेडमधील सभेत मेगा भरती, राष्ट्रवादीचे दिग्गज नेते रांगेत
Follow us
| Updated on: Aug 27, 2019 | 5:56 PM

नांदेड : काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या नांदेडमध्ये भाजपाने पक्ष प्रवेशाची जंबो भरती (Nanded Mahajanadesh Yatra) आयोजित केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जनादेश यात्रा (Nanded Mahajanadesh Yatra) 30 ऑगस्ट रोजी नांदेडमध्ये पोहोचणार आहे. या यात्रेनिमित्ताने नांदेडमध्ये मुख्यमंत्र्याच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय. 30 ऑगस्ट रोजी नवा मोंढा मैदानात ही जाहीर सभा होणार आहे. या सभेमध्ये भाजप प्रवेशाची जंबो भरती आयोजित करण्यात आली आहे.

स्वतः मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत यावेळी भाजपमध्ये अनेकांचा प्रवेश होणार आहे. त्यात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर आपल्या असंख्य समर्थकांसह भाजप मध्ये प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे यावेळी गोरठेकरांसह भोकर विधानसभा मतदारसंघातील वेगवेगळ्या पक्षातील अनेक जण भाजपमध्ये भरती होणार आहेत. मुख्यमंत्र्याच्या जनादेश यात्रेबाबत बोलताना स्वतः खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी ही माहिती दिली.

वाचा – सत्कार समारंभ भाजपच्या खासदाराचा, उपस्थिती राष्ट्रवादीच्या नेत्याची

भोकर हा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला समजला जातो. स्वतः चव्हाण तिथून निवडणुकीत उभे राहण्यासाठी तयारी करत आहेत. अशा स्थितीत अशोक चव्हाण यांना खिंडीत पकडण्यासाठी भाजपने खेळी खेळणं सुरू केलंय. त्यातून अशोक चव्हाण यांना भोकरमध्ये गुंतवण्यासाठी त्यांचे तगडे प्रतिस्पर्धी बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांना भाजपने आपल्या जाळ्यात ओढलंय. बापूसाहेब यांच्यासोबतच भोकर विधानसभा मतदारसंघातील जनाधार असलेले अनेक नेते आणि कार्यकर्त्यांचा मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होणार आहे.

वाचा – माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांचा राष्ट्रवादीला रामराम

दरम्यान, भाजपमध्ये येण्यासाठी जिल्ह्यातील एक विद्यमान आमदार उत्सुक आहे. आपल्या पक्षात राहून आपण पुन्हा निवडून येऊ की नाही याची खात्री त्या आमदारास नाही. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी हे आमदार जोरदार फिल्डिंग लावत असल्याची माहिती आहे. मात्र या आमदाराला भाजपमध्ये घ्यावं की नाही यावर सध्या वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याचं बोललं जातंय. या आमदाराबाबत लवकरच अंतिम निर्णय होईल अशी माहिती भाजपातील सूत्रांनी दिली आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.