गोपीनाथ मुंडेंचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करणार, मराठवाडा दुष्काळमुक्त करु : मुख्यमंत्री

बीड : दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध नेत्यांनी परळीतील गोपीनाथ गडावर हजेरी लावली. मुख्यमंत्री फडणवीसांनी गोपीनाथ मुंडेंची आठवण काढत, त्यांनी आम्हाला नेतृत्त्व करण्याची ताकद दिली, असं सांगितलं. शिवाय या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात युतीने जे यश मिळवलंय, ते पाहण्यासाठी आज गोपीनाथ मुंडे असायला हवे होते, असंही ते म्हणाले. कार्यक्रमाला […]

गोपीनाथ मुंडेंचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करणार, मराठवाडा दुष्काळमुक्त करु : मुख्यमंत्री
Follow us
| Updated on: Jun 03, 2019 | 4:14 PM

बीड : दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध नेत्यांनी परळीतील गोपीनाथ गडावर हजेरी लावली. मुख्यमंत्री फडणवीसांनी गोपीनाथ मुंडेंची आठवण काढत, त्यांनी आम्हाला नेतृत्त्व करण्याची ताकद दिली, असं सांगितलं. शिवाय या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात युतीने जे यश मिळवलंय, ते पाहण्यासाठी आज गोपीनाथ मुंडे असायला हवे होते, असंही ते म्हणाले.

कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार सुजय विखे पाटील, खासदार जयसिद्धेश्वर स्वामी, खासदार सुधाकर शृंगारे, खासदार संजय जाधव यांच्यासह पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या उपस्थित होत्या.

“आजचा दिवस काहूर माजवणारा असतो”

आजचा दिवस आमच्यासाठी आठवणींचे काहूर माजवणारा असतो. ज्यांना पाहून आपण मोठं झालो, त्यांना श्रद्धांजली देत असताना अनेक भावना काहूर माजवत असतात. मुंडे साहेबांचं नेतृत्व अफाट होतं, त्यांचा परिसस्पर्श झाला की सामान्य माणूस सुद्धा नेतृत्व करू लागत होता. मुंडे साहेबांनी नेतृत्व शिकवण्याचं काम केलं. मुंडे साहेबांनी आणि प्रमोद महाजनांनी संघर्ष केला, त्याच्या जोरावर भाजप उभी राहिली आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

मुंडे साहेब आपल्यात नाहीत याचं दुःख सातत्याने आपल्याला असणार आहे. युतीचे 41 खासदार निवडून आले याचं श्रेय नरेंद्र मोदी यांचं आहे. कारण मोदींनी गरीबांच्या कल्याणासाठी कामं केली आहेत. त्यामुळे ना भूतो ना भविष्यती यश दिलं आणि हे यश गोपीनाथ मुंडे यांचं सुद्धा आहे. कारण त्यांनी आम्हाला नेतृत्व करायला शिकवलं आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी गोपीनाथ मुडेंसोबतच्या आठवणींना उजाळा दिला.

“पुढील वेळी मराठवाड्यातल्या सर्व जागा जिंकू”

एक खासदार चार हजार मतांनी राहिला ही कमतरता पुढील वेळी भरून काढू, असं म्हणत औरंगाबादमधील पराभवावरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं. चार हजार मतांनी आमची संभाजीनगरची सीट आली असती तर गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न साकार झालं असतं. पण यावेळी नाही झालं तरी पुढच्या वेळी मराठवाड्यातल्या आठही जागा युतीच्या असतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

गोदावरीच्या खोऱ्यातील भाग दुष्काळ मुक्त झाला पाहिजे, या खोऱ्यात समुद्रात वाहून जाणारे पाणी आणले गेले पाहिजे, याचा प्लॅन आम्ही तयार केलाय, तो प्लॅन आम्ही पूर्ण करु. 25 हजार कोटी रुपयांची वाटर ग्रीड योजना पूर्ण करणार आहोत, सगळी धरणे पाईपलाईनने जोडणार आहोत. मुंडे साहेबांचे प्रत्येक स्वप्न आम्ही साकार करणार आहोत. मुंडे साहेबांचे स्वप्न जेव्हा साकार करू तेव्हाच आम्हाला त्यांचे नाव घेण्याचा अधिकार मिळेल. पंकजा आणि प्रीतम मुंडे गोपीनाथ मुंडे यांचा अंश आहेत. त्या पावलावर पाऊल ठेवून काम करत आहेत, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

काही लोक म्हणतात, पंकजा गोपीनाथरावांचे नाव का लावतात. अरे त्या नाव लावणार नाहीत तर तुमच्या सारखे करंटे लावतील का… गोपीनाथ मुंडे यांचं नाव त्यांच्या विचारांवर चालणाऱ्या प्रत्येकाला लावण्याचा अधिकर आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीत लागेल ती मदत करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. दुष्काळासाठी खजिना खाली झाला तरी चालेल, पण दुष्काळात कुठेही कमी पडणार नाही. येत्या काळात पुन्हा एकदा परीक्षेला सामोरं जायचं आहे. आमचं कार्य प्रामाणिक आहे. क्षण ना क्षण लोकांसाठी वाहिलाय. मुंडे साहेबांसारखी आम्ही जनतेची सेवा करु. मुंडे साहेब तुमच्या स्वप्नातला महाराष्ट्र साकार करू, असं आश्वासन त्यांनी दिलं.

मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.