Eknath Shinde : मोदी शाह भेटीनंतर शिंदे-फडणवीस मुंबईत परतले, मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला?

Devendra Fadnavis : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीहून रात्री अडीच वाजता मुंबईत पोहचले...

Eknath Shinde : मोदी शाह भेटीनंतर शिंदे-फडणवीस मुंबईत परतले, मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला?
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस,
Follow us
| Updated on: Jul 23, 2022 | 7:52 AM

मुंबई : सध्या राज्याच्या राजकारणात एकच प्रश्न अनेकांच्या मनात रुंजी घालतोय की, मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळण्याची शक्यता आहे. कारण दिल्ली दौरा आटोपून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दिल्लीहून रात्री अडीच वाजता मुंबईत पोहचलेत. आता मोदी-शाहांसोबत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीनरचे आयोजन केला होता. त्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सहभागी झाले होते. हा दौरा आटोपून दोघेही मुंबईत परतलेत. त्यामुळे मंत्रिमंडळ आता मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार हे पाहणं महत्वाचं असेल.

देवेंद्र फडणवीस म्हणाले…

दिल्ली दौऱ्यावर असताना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विस्ताराबाबत विचारलं असता, ‘अजून तारीख ठरलेली नाही, पण मला असं वाटतं की आता लवकरात लवकर हा विस्तार होईल. त्याबाबतच्या घडामोडी आमच्या चाललेल्या आहेत, त्यामुळे लवकरच विस्तार करु. सुप्रीम कोर्टचा याच्याशी काही संबंध नाही. उलट सुप्रीम कोर्टात आमची केस अतिशय मजबूत आहे. त्याचा आणि याचा काही संबंध नाही’, असं फडणवीस म्हणाले.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्री काय म्हणाले?

राष्ट्रपतींच्या विजयानंतर आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचे जेवण होतं. त्या ठिकाणी सर्वच भेटले. मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशनच्यापूर्वी होईल, असं शिंदे यांनी सांगितलं. सुप्रीम कोर्टातील सुनावणीसाठी थांबला आहात का? असा प्रश्न विचारला असता, असं काहीच नाही, सुप्रीम कोर्टाने असं काही सांगितलेलं नाही. सुप्रीम कोर्टाचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा काही संबंध नाही आणि कुठल्याही कामकाजावर सुप्रीम कोर्टाने स्टे दिलेला नाही. त्यामुळे तो विषय नाही, आम्ही लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करू, असं शिंदेंनी स्पष्ट केलं. अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होईल. मंत्रिपदाच्या यादीवर चर्चा करायची असतील तर मुंबईत होईल ती दिल्लीत कशाला होईल, असेही शिंदे म्हणाले.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.