Aurangabad | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी, औरंगाबाद पोलिसात तक्रार दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा औरंगाबाद दौऱ्यावरून वाद निर्माण झाला आहे.

Aurangabad | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी, औरंगाबाद पोलिसात तक्रार दाखल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा औरंगाबाद दौरा वादातImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Aug 02, 2022 | 10:34 AM

औरंगाबादः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekanth Shinde) यांचा औरंगाबाद दौरा वादात सापडला आहे. एकनाथ शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी औरंगाबाद पोलिसात तक्रार दाखल झाली आहे . औरंगाबाद दौऱ्यात मुख्यमंत्री महोदयांनी रात्री 10 नंतर लाऊड स्पीकरवर (Loudspeaker) भाषण केल्याने केली गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. शनिवार आणि रविवारी मुख्यमंत्री औरंगाबादेत (Aurangabad) होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी रात्रीच्या वेळी कार्यक्रम घेतले आणि यावेळी लाऊडस्पीकर वापरण्यात आला, जो सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात असल्याची तक्रार करण्यात आली आहे. आनंद कस्तुरे यांनी औरंगाबाद येथील क्रांती चौक पोलीस ठाण्यात ही तक्रार दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध कृती केल्याचे पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. औरंगाबाद शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे रात्री दोन ते तीन वाजेपर्यंत कार्यक्रम सुरु होते. त्यामुळे याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तक्रारीत नेमकं काय म्हटलंय?

चिकलठाणा येथील रहिवासी अर्जदार आनंद कस्तुरे यांनी ही तक्रार दिली आहे. ते आंबेडकरी चळवळीत सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतात. ३१ जुलै रोजी क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ स्टेजवर रात्री १० ते अकरा वाजेच्या दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ सिंदे यांनी लाऊड स्पीकरद्वारे भाषण करून सर्वोच्च न्यायालयायाच्या आदेशाचं उल्लंघन केलं आहे, तसेच त्या ठिकाणी बेकायदेशीर जमावसुद्धा उपस्थित होता, असं तक्रारीत म्हटलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

आजच्या पुणे दौऱ्यात काय वाद?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी हडपसर येथील उद्यानाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव देण्याचं नियोजन होतं. मात्र काही स्वयंसेवी संघटनांनी याला आक्षेप घेतला होता. हडपसर येथील उद्यानाची जागा महापालिकेची आहे. मात्र उद्यानाचा विकास आपण केल्याचा दावा नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी केला आहे. त्याप्रमाणे परिसरातील रहिवासी आणि महापालिका आयुक्त यांच्यासोबत झालेल्या बैठकीत उद्यानाला शिंदे यांचं नाव देण्यास सहमती दर्शवण्यात आली होती, असाही त्यांचा दावा आहे. मात्र महापालिकेचा कारभार प्रशासकांच्या हाती आहे. महापालिकेच्या प्रकल्पाचा उद्घाटन समारंभ प्रशासनाच्या माध्यमातून आयोजित होणे अपेक्षित आहे. तरीही नगरसेवकांनी स्वतःच या कार्यक्रमाचं आयोजन केल्यामुळे काही स्वयंसेवी संघटनांनी यावर आक्षेप घेतला होता. त्यामुळे हा उद्घाटन कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.