Video : एकनाथ शिंदेंचा व्हिडीओ कॉल! अपघातात वारकरी महिला जखमी, ‘त्यांची काळजी घ्या’ मुख्यमंत्र्यांच्या डॉक्टरांना सूचना
Aurangabad Eknath Shinde Video Call : शिंदे यांनी या जखमी महिलेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही काळजी घेण्याच्या सूचना दिल्या
औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde News) यांनी अपघातात जखमी झालेल्या वारकरी महिलेची चौकशी केली. व्हिडीओ कॉल (Eknath Shinde Call Video) करत मुख्यमंत्र्यांनी अपघातग्रस्त महिलेची विचारपूस केली. पंढरपूरवरुन परतत असताना वारकऱ्यांच्या गाडीचा अपघात झाला होता. या अपघातामध्ये (Accident News) महिला वारकरी जबर जखमी झाली होती. तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या जखमी महिलेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. विनोद पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना या महिलेबाबत माहिती दिली. त्यानंतर मुख्ममंत्र्यांनी व्हिडीओ कॉलद्वारे या जखमी महिलेची विचारपूस करत त्यांची आस्थेनं चौकशी केली. या अपघातग्रस्त महिलेवर औरंगाबादच्या सिगमा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी डॉक्टरांशीही संवाद साधत त्यांना योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन केलं.
पाहा व्हिडीओ : जेव्हा मिरजमध्ये वारकऱ्यांच्या गाडीला अपघात..
वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना
याआधी एकनाथ शिंदे यांनी कॉल करत सांगली-पंढरपूर मार्गावर अपघात झालेल्या वारकऱ्यांची फोनवरुन चौकशी केली होती. त्यानंतर वारकऱ्यांच्या उपचारामध्ये कोणतीही कमी राहू नये, यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या.
पाहा व्हिडीओ : चिमुकलीसोबत दिलखुलास संवाद
आता औरंगाबादेतील जखमी महिलेचीही मुख्यमंत्र्यांनी विचारपूस करत काळजी घेण्याचं आवाहन केलंय. तसंच या महिलेची विचारपूस करत त्यांना नेमकं कुठे लागलं? अपघात कुठे झाला? याबाबतही मुख्यमंत्री शिंदे यांनी चौकशी केली.
औरंगाबादेत उपचार
औरंगाबादेत जखमी झालेल्या महिलेल्या बरगड्यांना मार लागला आहे. या महिलेवर शस्त्रक्रिया करावी लागू शकते, अशी डॉक्टरांनी या व्हिडीओ कॉलमध्ये म्हटलंय. तसंच या महिलेच्या उपचाराचा सर्व खर्चही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उचललाय. दरम्यान, सिगमा रुग्णालयातील डॉक्टरांनीही आम्ही उपचारामध्ये कोणतीही हयगय करणार नाही, सर्वतोपरी मदत वारकरी महिलेला करु आणि त्यांना बरं करु, असं म्हणत आश्वस्त केलंय.
दरम्यान, याआधी एका चिमुकलीसोबतचाही एकनाथ शिंदे यांचा व्हिडीओ कॉल व्हायरल झाला होता. या चिमुकलीसोबत त्यांनी दिलखुलास बातचीत केली होती. तर त्याआधी अधिकाऱ्यांना फोनवरुन सूचना देतानाचेही काही फोन कॉल्सचे व्हिडीओ समोर आले होते.