Big News : एकनाथ शिंदेंच्या मेळाव्याला ठाकरेंना आमंत्रण!

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शिवाजी पार्कवर तर शिंदेगटाचा बीकेसी मैदानावर मेळावा पार पडतोय. पण शिंदे यांच्या मेळाव्याला ठाकरेंना आमंत्रण देण्यात आलं आहे.

Big News : एकनाथ शिंदेंच्या मेळाव्याला ठाकरेंना आमंत्रण!
Follow us
| Updated on: Oct 05, 2022 | 12:42 PM

दिनेश दुखंडे, प्रतिनिधी, TV9 मराठी, मुंबई : आजचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. शिंदेगटाच्या (Eknath Shinde Dasara Melava) बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात अभूतपूर्व बदल झाला. त्यानंतर आज पहिला दसरा मेळावा होत आहे. त्यामुळे यंदाच्या या दसरा मेळाव्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा शिवाजी पार्कवर तर शिंदेगटाचा बीकेसी मैदानावर मेळावा पार पडतोय. एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्याला ठाकरेंना आमंत्रण देण्यात आल्याची माहिती आहे.

काही दिवसांआधी निहार ठाकरे आणि स्मिता ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांना आता शिंदेगटाच्या दसरा मेळाव्याचं आमंत्रण देण्यात आलं असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी टीव्ही 9 मराठीला दिली आहे. स्मिता ठाकरे आणि निहार ठाकरे या मेळाव्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

दसरा मेळाव्याला अवघे काही तास शिल्लक असताना शिंदेगटाकडून या सभेचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. “ही वेळ आहे अनेक नव्या संकल्पांसह सीमोल्लंघनाची हिंदूत्व आणि मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी, राज्यातील माय-बाप जनतेच्या सुखसमृद्धी आणि भरभराटीसाठी. मा. बाळासाहेबांच्या आशीर्वादानं आपण सगळे जमणार आहोत बीकेसी मैदानावर. सर्वांना विजयादशमीच्या, दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा”, असं कॅप्शन देत एकनाथ शिंदे यांनी हा टीझर ट्विट केला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.