शिंदे फडणवीसांमध्ये ‘वर्षा’वर तासभर बैठक, विविध विषयांवर चर्चा
पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यापासून महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार यांची राष्ट्रवादीतून फुटून गेलेल्या आमदारांनी काल भेट अचानक भेट घेतली आहे.
मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra political crisis) मागच्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडी एकदम जलदगतीने घडत असल्याच्या पाहायला मिळत आहे. अजित पवार (Ajit pawar) यांचा एक गट फुटून भाजपच्या सत्तेत सहभागी झाल्यापासून रोज नव्या घटना घडत आहेत. अजित पवार यांच्यासोबत आलेल्या अनेक आमदारांना मंत्रीपद मिळाली. त्यामुळे शिंदे गटात असलेल्या आमदारांनी उशिरा आलेल्या लोकांना पहिल्यांदा जेवण असा टोला देखील लगावला होता. सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. काल शरद पवार (sharad pawar) यांना राष्ट्रवादीचा फुटून गेलेला गट भेटण्यासाठी चव्हाण सेंटर येथे गेला होता. तेव्हापासून पुन्हा राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
विविध विषयांवर ही बैठक झाल्याची माहिती
काल रात्री उशिरा शिंदे आणि फडणवीस यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रात्री उशिरा तासभर बैठक सुरु होती. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विविध विषयांवर ही बैठक झाल्याची माहिती मिळाली आहे.
शिंदे गटातील अनेक आमदार नाराज
राष्ट्रवादीचा एक गट फुटून सत्तेत सामिल झाल्यामुळे शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याची माहिती मिळाली होती. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याचबरोबर त्यांच्यासोबत ९ आमदारांना सुध्दा त्यांनी मंत्रीपदाची शपथ दिली. दोन दिवसांपूर्वी मंत्र्यांना खाती वाटप करण्यात आली, तेव्हापासून शिंदे गटातील अनेक आमदार नाराज असल्याचं चर्चा सुरु आहे.
भाजपसोबत आम्ही कधीचं जाऊ शकत नाही
शरद पवारांना काल ज्यावेळी अजित पवार यांचा गट भेटला. त्यानंतर अनेकांना उत्सुकता होती की, पवारांची भूमिका काय असेल. परंतु पवारांनी काल स्पष्ट केलं की, भाजपसोबत आम्ही कधीचं जाऊ शकत नाही. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात रात्री उशिरा तासभर बैठक झाली आहे.