Cm Eknath Shinde : शिंदे सरकारचा उद्या सुप्रीम कोर्टात फैसला, कोण जोमात? कोण कोमात? कायद्याच्या कचाट्यातली अग्निपरीक्षा

. या याचिके वरती गेल्या काही दिवसांपूर्वी सुनावणी पार पडली. त्यावेळेस दोन्ही बाजूने घमसान युक्तीवाद झाला.  कोर्टाने दोन्ही पक्षांना पुढची तारीख एक ऑगस्ट अशी दिली होती. मात्र या तारखेत बदल होऊन ही सुनावणी तीन ऑगस्टवरती गेली.

Cm Eknath Shinde : शिंदे सरकारचा उद्या सुप्रीम कोर्टात फैसला, कोण जोमात? कोण कोमात? कायद्याच्या कचाट्यातली अग्निपरीक्षा
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष किती काळ चालणार? सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी 8 ऐवजी 12 ऑगस्टला होण्याची शक्यता- सूत्रImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 02, 2022 | 7:18 PM

मुंबई : गेल्या एक महिन्यापूर्वी राज्यात ठाकरे सरकार (Uddhav Thackerya) पडून शिंदे-फडणवीस (Cm Eknath Shinde) सरकार आलं यावेळी बरेच राजकीय नाट्य घडलं. मात्र हे राजकीय नाट्य राजकारणाापुरते मर्यादित राहिलं नाही. तर हा वाद थेट सुप्रीम कोर्टापर्यंत (Supreme Court) पोहोचला. एकनाथ शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्र ठरवा. हे सरकार बेकायदेशीररित्या अस्तित्वात आलं आहे. तसेच शिवसेनाही ठाकरेंची आहे आणि धनुष्यबाण हा आमचाच आहे, असे म्हणत ठाकरे गट सुप्रीम कोर्टात पोहोचला. ठाकरे गटाकडून शिंदे विरोधात तब्बल चार याचिका दाखल करण्यात आल्या. या याचिके वरती गेल्या काही दिवसांपूर्वी सुनावणी पार पडली. त्यावेळेस दोन्ही बाजूने घमसान युक्तीवाद झाला.  कोर्टाने दोन्ही पक्षांना पुढची तारीख एक ऑगस्ट अशी दिली होती. मात्र या तारखेत बदल होऊन ही सुनावणी तीन ऑगस्टवरती गेली. आता उद्या शिंदे सरकारचा फैसला सुप्रीम कोर्टात होणार आहे.

गेल्या वेळी काय युक्तीवाद झाला

गेल्यावेळी झालेल्या युक्तीवादामध्ये शिंदे गटाकडून त्यांची बाजू मांडताना एखाद्या मोठ्या गटाला त्यांचा नेता बदलाव वाटला तर त्यात गैर काय? असा युक्तिवाद करण्यात आला. मात्र कुठेतरी गुवाहाटीत बसून सांगणे शिवसेना आमचीच हे किती योग्य आहे? असे सवाल ठाकरेंच्या वकिलांकडून विचारण्यात आले. तसेच एक गट फुटणं वेगळा आणि पूर्ण पक्ष पूर्ण वेगळा असेही सांगण्यात आलं, त्यावेळी कोर्टाने या सुनावणीसाठी घटनात्मक खंडपीठं असावे असेही मत व्यक्त केलं होतं. कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर 27 जुलै पर्यंत कागदपत्र दाखल करण्यासाठी वेळ दिला होता. त्यानंतरच आता उद्याची सुनावणी पार पडत आहे.

दोन्ही गट म्हणतात आम्हीच जिंकणार?

तर कोर्टातली लढाई ही आम्ही जिंकणार आहे. आता आमच्याकडे दोन तृतीयांश बहुमत आहे. त्यामुळे आमचं सरकार हे पूर्णपणे कायदेशीर मार्गाने स्थापन झालेलं आहे आणि शिवसेना आणि धनुष्यबाण आमचाच आहे. असा दावा हा एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून करण्यात येतोय. मात्र दुसऱ्या वेळेला आम्हाला कोर्टात न्याय मिळेल आणि शिंदे गटाला मोठा दणका बसेल, हे सरकार बेकायदेशीर आहे, असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात येतोय. महाविकास आघाडीचे नेते हे अशाच काही प्रतिक्रिया देत आहेत. मात्राचा शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचा आणि कायदेशीर बेकायदेशीर कोण? हे तर सुप्रीम कोर्ट ठरवणार आहे. त्यामुळे उद्याच्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.