Cm Eknath Shinde : मोदींच्या मागे मुख्यमंत्री शेवटच्या रांगेत, फोटोवरून अमोल मिटकरींनी भाजपला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करून दिली

आता दोन्ही बाजूने प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिवसेनेच्या बाजूने या फोटोला उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलंय. तर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी भाजप नेत्यांना थेट छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करून दिलीय.

Cm Eknath Shinde : मोदींच्या मागे मुख्यमंत्री शेवटच्या रांगेत, फोटोवरून अमोल मिटकरींनी भाजपला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करून दिली
मोदींच्या मागे मुख्यमंत्री शेवटच्या रांगेत, फोटोवरून अमोल मिटकरींनी भाजपला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करून दिलीImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Aug 07, 2022 | 8:40 PM

नवी दिल्ली : आज दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या (PM Modi) उपस्थितीत निती आयोगाची एक बैठक पार पडली. या बैठकीला देशभरातील सर्वच राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते. या बैठकीत विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. मात्र आता बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांच्या फोटोची जास्त चर्चा होऊ लागलीय. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मोदींच्या मागे शेवटच्या रांगेत उभे असल्याचा एक फोटो ट्विट केलाय आणि त्यावरून काही सवाल उपस्थित करत भाजपवर टीकास्त्र सोडलंय. त्यावरून आता दोन्ही बाजूने प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिवसेनेच्या बाजूने या फोटोला उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलंय. तर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी भाजप नेत्यांना थेट छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करून दिलीय.

अमोल मिटकरी काय म्हणाले?

निती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना शेवटच्या रांगेत उभं केलं. शिंदेसाहेब तुम्ही वारंवार बाळासाहेब आणि दिघेसाहेबांचा वारसा सांगता, आम्हाला अभिमान आहे तुमचा, तुम्ही त्यांचे वारसदार आहात. मात्र तुम्ही इतिहासाची पानं सुद्धा थोडी चाळा, 1666 ला जयसिंगांच्या मागे छत्रपती शिवरायांना आग्रा दरबारात उभं केल्यानंतर शिवाजी महाराजांचा स्वाभिमान उफाळून आला होता आणि त्यांनी दिल्लीचा बादशाह औरंगजेबाला त्यांनी मराठा साम्राज्याचं पाणी दाखवलं होतं. तो दरबार लाथाडला होता आणि वेळ पडली तर मी मृत्यूला सामोरं जाईल, वेळ पडली तर नजरकैदी होईल, पण त्याच्या समोर शरण जाणार नाही, अशी भूमिका घेतली होती.

हा सांगणारा महाराष्ट्र तेव्हापासून दिल्लीचे तक्त राखीतो. महाराष्ट्र माझा हा आपण गौरवाने म्हणतो. त्याच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आज आपण शेवटच्या रांगेत राहतील तर हा महाराष्ट्राचा अपमान आणि मराठी माणसांचा अपमान आहे .या गोष्टीचं समर्थन भाजप निर्लज्यासारखं करतेय. तुम्ही स्वाभिमानी आहात हा महाराष्ट्र मोघलांच्या तावडीतून सोडवा, असे आवाहनच त्यांनी मुख्यमंत्र्यांना केलंय. तसेच 33 टक्के टॅक्स आपण देशाचा भरत असतो. मात्र तूर्तास आपल्या वागण्याने मराठी माणसांना वेदना झाल्यात आणि दिल्लीपुढे महाराष्ट्र झुकलाय का? असा प्रश्न आम्हाला पडतो, असेही ते म्हणालेत.

रोहित पवारांचं ट्विट काय?

उदय सामंतांचं रोहित पवारांना प्रत्युत्तर

राजकारणासाठी राजकारण करण्यात काहीच अर्थ नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून दिल्लीत महाराष्ट्र मानसन्मान वाढलेला आहे. ज्यावेळी राष्ट्रपती यांचा शपथविधी झाला. त्यावेळी एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत पहिल्या रांगेत होते हे विसरून चालणार नाही. अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रवक्ते उदय सामंत यांनी रोहित पवार यांच्या ट्विटवर दिली आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.