ठाकरेंना घेरण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा प्लॅन
ठाकरेंना रोखण्यासाठी शिंदेगट मोठा प्लॅन आखत आहे.
मुंबई : दसरा मेळावा (Dasara Melava) शिवसेनेच्या राजकीय वाटचालीतील महत्वाची बाब आहे. दसरा मेळावा म्हणजे ठाकरेंनी विरोधकांवर डागलेली तोफ… पण यंदाचा दसरा मेळावा कुठे होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ठाकरेंना रोखण्यासाठी शिंदेगट मोठा प्लॅन आखत आहे. कारण ठाकरेंच्या सभांचं केंद्रबिंदु असणारं शिवाजी पार्क गोठवलं जाण्याची शक्यता आहे. ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर (Shivaji Park) घेण्यापासून रोखण्याचा शिंदेंचा प्लॅन आहे. जर शिवाजी पार्क गोठवलं गेलं तर उद्धव ठाकरे यांची मोठी अडचण होऊ शकते.
सध्या सत्तासंघर्षावरची सर्वोच्च सुनावणी दिल्लीत होतेय. सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. याचवेळी मुंबईतही शिंदेगटाने ठाकरेंना घेरण्याचं ठरवल्याचं दिसतंय.
हे सुद्धा वाचा