नवी दिल्ली : राज्यात सरकार स्थापन होऊन तब्बल 37 उलटून गेले आहेत. मात्र तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) हा अजूनही रखडलेलाच आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी अनेक दिल्ली वाऱ्या केल्या आहेत. त्यांच्यासोबतच फडणवीसही दिसून आले. मात्र तिरीही मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडलेला नाही. आजही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत आहेत. यावेळी त्यांना मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आणि अजित पवारांकडून (Ajit Pawar) होणाऱ्या टीकेबाबत विचारले असता, लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, एवढंच उत्तर मुख्यमंत्री दिलंय. तसेच तारीख तुम्हाला लवकरच कळेल अजितदादा मला स्वतः म्हणाले तुम्ही छान काम करताय, लवकर लवकर तुम्ही निर्णय घेताय, असे म्हणत अजित पवारांनीच आमच्या कामाचं कौतुक केलंय, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले आहेत. त्यामुळे पुन्हा वेगळ्याच राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.
कोर्टामध्ये सरकार किंवा मंत्रिमंडळाच्या बाबतीमध्ये कुठलाही चर्चा होत नाही, किंवा कुठल्या प्रकाकरचा स्टे आहे का, बिलकुल नाही, त्यामुळे जे काही विरोधी पक्षांना वाटतंय, तसं नाहीये. एकच महिना झाला आम्हाला थोडा वेळ देणार की नाही आणि आता लवकर मंत्रिमंंडळ विस्तार होईल, असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलंय.
मंत्रिमंडळ विस्तार हा दोन ते तीन दिवसांमध्ये होईल अशी माहिती शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी दिली आहे. सचिवांच्या हाती कारभार दिला याचा अर्थ केवळ काही कामं रखडू नयेत हा आहे. विरोधकांनी टीका करणे लोकशाहीचा भाग आहे. अशी प्रतिक्रिया देखील सामंत यांनी दिली. मुख्यमंत्र्यांची दिल्ली वारी हा एक कामाचाच भाग असतो. यापूर्वी देखील राज्यातल्या कामांसाठी दिल्लीवारी करण्यात आलेली आहे असे सांगत सामंत यांनी आदित्य ठाकरे यांना उत्तर दिलय.
दोन मंत्र्यांचं जंबो मंत्रालय आहे. तरूण बेरोजगार आहेत , 37 दिवस झाले, राज्यात लक्ष नाही, यांच्या दिल्ली वाऱ्या सुरू आहेत, ते गद्दार आहेत. आम्ही निष्ठावंत स्वाभिमानी आहे. आमची शिवसेना ही बाळासाहेबांची, निष्ठावंतांची शिवसेना आहे, आम्ही छत्रपतींचं नाव घेतो, ही नवी शिवसेना हूजरेगिरी करतेय. आमची ऊद्धव ठाकरेंची शिवसेना आहे, तर त्यांच्या पायाखालची वाळू सरकलीये, अशी टीका आता मंत्रिमंडळ विस्तारावरून ठाकरे गटातील खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे. तर मंत्रिमंडळ विस्तारावरून अजित पवारही गेल्या अनेक दिवसांपासून सरकारवर जोरदार बरसत आहेत.