Cm Eknath Shinde : आम्ही जिंकून आलो आणि फटाके हे वाजवत आहेत, संजय राऊतांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचं काय उत्तर?
यांच्यात भांडणं होतील म्हणून देव पाण्यात ठेवून बसले आहेत. पण हे एकमेकांच्या मानगुटीवर बसणार नाहीत. विरोधकांच्या मानगुटीवर नक्कीच बसतील, असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांच्यासह संपूर्ण गटाने आज मुंबईत पुन्हा जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा तडाखेबाज भाषण केलंय. यात संजय राऊत (Sanjay Raut) आणि इतर टीका करणाऱ्या शिवसेना नेत्यांचा समाचार घेतला आहे. तसेच सुप्रीम कोर्टातील (Supreme Court) केसवरूनही जोरादर टोलेबाजी केली आहे. मी किती काळ आहे हे तुम्ही ठरवणारे कोण असा सावाल मुख्यमंत्र्यांनी यावेळी विरोधकांना केला. त्याचसोबत याची चिंता जनता करेल. जनतेने त्यांचा निर्णय केला आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांच्या चार मागण्या फेटाळल्यात तरी असे बोलत आहेत. त्यांना कोर्टाने पळवून लावलं. इकडे बोलतात आम्ही जिंकलो, अरे तुम्हाला तोंड लपवून पळावं लागलं आहे. तरीसुद्धा जिंकलो आम्ही आणि फटाके ते वाजवत आहेत, हसावं की रडावं हे कळेना, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे. तसेच यांच्यात भांडणं होतील म्हणून देव पाण्यात ठेवून बसले आहेत. पण हे एकमेकांच्या मानगुटीवर बसणार नाहीत. विरोधकांच्या मानगुटीवर नक्कीच बसतील, असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे.
माझ्याकडे अनेक कलाकार आहेत
आम्हाला इतर कोणत्या पक्षातून कोणतीही तोडफोड करायची नाही. मात्र मी असाच बसलो नाही, आत्ता तुम्हाला सर्व सांगत बसत नाही. माझ्याकडे खूप काही पर्याय आहेत, तसेच माझ्याकडे असलेले सर्व कलाकार लोक आहेत, त्यांची कलाकारी तुम्हाला कळणार पण नाही, असा सूचक इशारी त्यांनी ठाकरे गटाला दिला आहे.
माझा शब्द ऐकावाच लागतो
मला पंतप्रधानांनी माझं भाषण पूर्ण ऐकलं. मी मनापासून बोललो म्हणून त्यांनी ऐकल्याचे सांगितले. काल आम्ही लोकांच्या कल्याणाचे निर्णय घेतले आहेत. लोकांच्या गरजेसाठी आम्ही सर्वकाही करु. मी जिथे जातो तिथे माझं काम सुरू असतं. मी लिहिलेला शब्द अधिकाऱ्यांना पाळावा लागतो, असेही एकनाथ शिंदे यांनी यावेळी पुन्हा बजावलं आहे.
एकही आमदार पराभूत होऊ देणार नाही
आम्ही विरोधकांबाबत काहीही बोललो नाही, आमच्यावर यांनी वाट्टेल त्या शब्दात टीका केली. मात्र देवीने कुणाचा बळी घेतला हे आपण पाहिलं आहे त्यामुळे आता काहीही बोलत आहेत. आता बोलता, यातला एकही निवडून येणार नाही. पण मी सांगतो यातला एकही माणूस पराभूत होणार नाही. यातला एकही माणूस पराभूत झाला तर हा एकनाथ शिंदे राजकारण सोडून जाईल, असा विश्वासही आमदारांना यावेळी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. तसेच विरोधकांनाही हे थेट आव्हानच दिलं आहे.