कल्याण डोंबिवली : एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राजभर शिवसेनेचे कार्यकर्ते (Shivsena Dombivli) आक्रमक झाल्याचं. बघायला मिळालं अनेक बंडखोर आमदारांची कार्यालयं फोडण्यात आली तर अनेकांच्या पोस्टरला काळं फासण्यात आल्याचे प्रकार ही संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. त्यानंतर एकनाथ शिंदे या शिवसैनिकांना सज्जड भरतानाही दिसून आले. मात्र आता या प्रकरणाचा पुढचा अंक सुरू झालाय. डोंबिवलीत शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेत जोरदार राडा झालाय. यामध्ये शिवसेना कार्यकर्ते आणि शिंदे समर्थकांमध्ये मोठा वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे समर्थक शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेत घुसल्याने या वादाला तोंड फुटल्याचे सांगण्यात येत आहे. शाखेत घुसून शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांचा फोटो लावला, त्यानंतर ठाकरे समर्थक (Uddhav Thackeray) शिवैसिकही आक्रमक मोडवर आले आणि या वादाचं रुपांतर राड्यात झालंय.
राज्यातल्या शिवसेनेत उभी फूट पडल्यापासून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमधली उभी दुफळीही समोर आली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, कोकण हा भाग म्हणजे तर शिवसेनेचा हब मानलं जातं आणि एकनाथ शिंदे यांना याच भागातून मोठ्या प्रमाणात समर्थन मिळतंय. सर्वात आधी ठाण्यातल्या नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. त्यानंतर नवी मुंबई, नागपूर आणि त्यानंतर कल्याण डोंबिवलीतले नगरसेवक आणि हजारो कार्यकर्ते हे एकनाथ शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे या भागात एकनाथ शिंदे यांची ताकद मोठी वाढली आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसैनिकांची कोंडी होताना दिसून येते आणि त्याचेच रूपांतर वादात होताना दिसून येतंय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या प्रत्येक भाषणात आनंद दिघे यांचं आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नाव सुरुवातीलाच आवर्जून घेतात. आता या शाखेतल्या फोटो वरती एकदा नजर टाकल्यास नेमकं काय घडलं असावं, हाही प्रकार आपल्याला लक्षात येतो. या भिंतीवरती आनंद दिघे यांचा फोटो दिसतोय. तसेच बाळासाहेब ठाकरे यांचाही फोटो दिसतोय. त्यांच्या बाजूला श्रीकांत शिंदे यांचा फोटो दिसतोय आणि आता त्या फोटोंच्यामध्ये शिवसैनिक एकनाथ शिंदे यांचा फोटो लगावताना दिसतात. मात्र यावरूनच आता ठाकरे समर्थक शिवसैनिक आक्रमक झाले आणि त्यावरूनच कल्याण डोंबिवलीच्या शाखेत हा राडा झालाय. यामध्ये काही वेळ कार्यकर्त्यांमध्ये हमरातुमरीही झाल्याचे पाहायला मिळालं. भविष्यकाळात हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.