Raj Thackeray : मोठ्या शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरेंकडून भेटीगाठीला सुरुवात, आमदार सदा सरवणकरांनी ‘शिवतीर्था’वर घेतली सदिच्छा भेट

एकनाथ शिंदे समर्थक आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी आज राज ठाकरे यांची त्यांचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थावर जाऊन भेट घेतली. त्यावेळी राज्यातील चालू घडामोडींवरही चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.

Raj Thackeray : मोठ्या शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरेंकडून भेटीगाठीला सुरुवात, आमदार सदा सरवणकरांनी 'शिवतीर्था'वर घेतली सदिच्छा भेट
आमदार सदा सरवणकर यांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेटImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 06, 2022 | 12:44 PM

मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकार जाऊन शिंदे सरकार सत्तेत आलं. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलीय. या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया पार पडली. त्यामुळे राज ठाकरे राज्यातील उलथापालथीपासून काहीसे अलिप्तच होते. मात्र, आता राज ठाकरे शस्त्रक्रियेनंतर काहीसे सक्रिय होताना दिसत आहेत. त्यांनी भेटीगाठींनाही सुरुवात केलीय. एकनाथ शिंदे समर्थक आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी आज राज ठाकरे यांची त्यांचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थावर जाऊन भेट घेतली. त्यावेळी राज्यातील चालू घडामोडींवरही चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.

राज ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंचं अभिनंदन

शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर राज ठाकरे अद्याप माध्यमांसोर आलेले नाहीत. मात्र, राज यांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पत्राद्वारे अभिनंदन केलंय. तसंच शिंदे आणि फडणवीस यांना महत्वाचा सल्लाही राज ठाकरे यांनी दिलाय. एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन करताना राज ठाकरे म्हणाले की, एकनाथ शिंदेजी, आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात. आपले अभिनंदन. खरंच मनापासून आनंद झाला. नशिबाने आपल्याला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली आहे. आता ती स्वकर्तृत्वाने सिद्ध कराल ही आशा. आपण तरी बेसावध राहू नका. सावधपणे पावले टाका. पुन्हा एकदा आपले अभिनंदन!

राज ठाकरेंकडून फडणवीसांचं कौतुक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छा दिल्यात. तसंच फडणवीस यांचं राज ठाकरेंनी तोंडभरुन कौतुकही केलंय. ‘ही बढती आहे की अवनती ह्यात मी जात नाही आणि कुणी जाऊही नये. पण एक सांगतो की, धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचा तर दोरी मागे ओढावी लागते. ह्या मागे ओढलेल्या दोरीला कुणी माघार म्हणत नाही! तुम्हाला ह्या पुढेही बराच राजकीय प्रवास करायचा आहे. एक निश्चित की तुम्ही तुमचं कर्तृत्व महाराष्ट्रापुढे सिध्द केलेलंच आहे त्यामुळे देशाच्या भल्यासाठीही तुम्हाला अधिक काम करण्याची संधी मिळो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना’, अशा शब्दात राज ठाकरे यांनी फडणवीसांचं कौतुक केलंय.

Non Stop LIVE Update
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका.
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?.
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?.
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.