Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cm Eknath Shinde : आज शिंदे सरकारची बहुमत चाचणी, शिंदे गट आणि भाजपसाठी आजचा पेपर किती अवघड? संख्याबळ काय सांगतं?

राजकीय घडामोडींमध्ये विधानसभा अध्यक्ष उपाध्यक्ष यांची भूमिकाही महत्त्वपूर्ण राहिली आहे. आजही त्यांचा रोल तेवढाच मोठा राहणार आहे. हे सरकार बहुमत सिद्ध करू शकणार नाही असे दावे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून अनेकदा करण्यात आले. तर शिंदेंसमोरील आव्हान अजून सोपं दिसतंय.

Cm Eknath Shinde : आज शिंदे सरकारची बहुमत चाचणी, शिंदे गट आणि भाजपसाठी आजचा पेपर किती अवघड? संख्याबळ काय सांगतं?
आज शिंदे सरकारची बहुमत चाचणीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 6:29 AM

मुंबई : कुठलेही नवं सरकार स्थापन झालं की त्याला एक अग्नी परीक्षा ही द्यावीच लागते ती म्हणजे बहुमत चाचणीची, आज शिंदे गटाची (Eknath Shinde) आणि भाजप सरकारची बहुमत चाचणीची (Floor Test) अग्निपरीक्षा आहे. कालचा पेपर तर सरकारला सोपा गेला. काल मापक संख्याबळाच्या जोरावर विधानसभा अध्यक्षांची निवड (Assembly Speaker) करणे सरकारला सहज शक्य झालं. मात्र आजही सरकार अशीच बाजी मारणार की भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या आनंदात महाविकास आघाडी काही विघ्न आणणार? हेही पाहणे तेवढेच महत्त्वाचं ठरणार आहे. कालच्या राजकीय घडामोडींमध्ये विधानसभा अध्यक्ष उपाध्यक्ष यांची भूमिकाही महत्त्वपूर्ण राहिली आहे. आजही त्यांचा रोल तेवढाच मोठा राहणार आहे. हे सरकार बहुमत सिद्ध करू शकणार नाही असे दावे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून अनेकदा करण्यात आले.

फडणवीस-शिंदेंचे सर्व डावपेच यशस्वी ठरले

मात्र त्यांचे आजपर्यंतचे सर्व दावे फेल ठरले आहेत आणि एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांचा प्रत्येक डावपेस हा यशस्वी ठरला आहे. त्यांचे हेच डावपेच त्यांना सत्तेच्या खुर्ची पर्यंत घेऊन गेले आहेत. मात्र आज सरकारला बहुमत चाचणीच्या या सर्वात मोठ्या कसोटीला पार करावं लागणार आहे.

आकडे कुणाच्या बाजुने?

या बहुमत चाचणीचं गणित कसं असणार आहे, हे एकदा आकड्यांच्या खेळातूनही समजून घेऊया. काल विधानसभा अध्यक्ष निवडीमध्ये शिंदे सरकारला 164 आमदारांचा पाठिंबा असल्याचे जाहीरपणे दिसून आले. त्याच जोरावर राहुल नार्वेकरांचा विजय झाला. तर रविवारी महाविकास आघाडीची गाडी मात्र केवळ 106 मतांवर अडकलेले दिसून आले. अर्थात संख्याबळ कमी असल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला. आजचा चित्रही काहीसं असंच राहणार आहे.

विधीमंडळाच्या निर्णयाने गणित बदललं

आकड्यांचा गणित हे कालपर्यंत तर असंच राहिलं होतं. मात्र कालच एक असा मोठा निर्णय आला ज्याने आकड्यांचे गणित आणखी हलून जाण्याची शक्यता आहे. विधिमंडळाने एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा दिला तर उद्धव ठाकरे यांना एक मोठा दणका दिला. एकनाथ शिंदे हेच गटनेते राहतील असा निर्णय विधिमंडळाने दिला, तर अजय चौधरी यांचे गटनेतेपद विधिमंडळाने रद्द केलं आहे. त्यामुळे आजच्या बहुमत चाचणीमध्ये शिवसेनेचे उर्वरित आमदार कुणाच्या व्हीप वरती मतदान करणार हेही अनिश्चित आहे. हा वाद वाढल्यास या आमदारांना मतदान करता येणार नाही, शिवसेने पुढे आता कोर्टात जाण्याचा एकमात्र मार्ग उपलब्ध असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस हा राज्याच्या राजकारणात वादळी ठरणार एवढं मात्र नक्की.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.