Cm Eknath Shinde Video : देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वागतात का?हे पाच प्रसंग काय सांगतात?
आजच अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावरूनच जोरदार टोलेबाजी केली आहे. तसेच गेल्या अडीच वर्षात तुम्हाला असे चित्र कुठेही दिसलं का? असा सवालही केला आहे. ते पाच प्रसंग कोणते यावरही एक नजर टाकूया...
मुंबई : एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांचं नाव मुख्यमंत्रीपदी फडणवीसांनी (Devendra Fadnavis) जाहीर केले आणि सर्वांनाच ते सरप्राईजिंग वाटलं. त्यानंतर आता एकापाठोपाठ एक काही असे प्रसंग घडले की ज्या प्रसंगांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्याप्रमाणे वागताहेत का? असे सवाल उपस्थित झाले. मग पत्रकार परिषदेत चिठ्ठी पाठवणे असो, एकनाथ शिंदे यांच्या समोरचा माईक घेणं असो किंवा एकनाथ शिंदे यांना बोलण्यासाठी फडणवीस यांना विचारावं लागणं असो, अशा काही घटना कॅमेऱ्याने कैद केल्या आहेत. ज्यावरून आता विरोधकही तशीच खोचक टीका मुख्यमंत्र्यांवर आणि उपमुख्यमंत्र्यांवर करू लागले आहेत. आजच अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावरूनच जोरदार टोलेबाजी केली आहे. तसेच गेल्या अडीच वर्षात तुम्हाला असे चित्र कुठेही दिसलं का? असा सवालही केला आहे. ते पाच प्रसंग कोणते यावरही एक नजर टाकूया…
पहिला प्रसंग-नड्डांच्या नावाची आठवण करून दिली
यातला पहिला प्रसंग म्हणजे एकनाथ शिंदे बोलत असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं नाव घेण्याची आठवण करून देताना दिसून आले आहेत. त्याचाही व्हिडिओही बराच चर्चेत राहिला आहे.
पाहा व्हिडिओ
दुसरा प्रसंग-बोलण्यासाठी फडणवीसांना विचारलं
यातला दुसरा प्रसंग म्हणजे विधानसभेत अधिवेशात अभिनंदन प्रस्तावावर भाषणं सुरू होती. यावेळी फडणवीसांच्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी उभे राहून नमस्कार करू शकतो का? अशी विचारणा फडणवीसांकडे केली. हा एक क्षणही बराच चर्चेत राहिला.
पाहा व्हिडिओ
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 14, 2022
तिसरा प्रसंग-फडणवीस आटोपतं घ्या म्हणाले
त्यानंतर यातला तिसरा महत्त्वाचा प्रसंग म्हणजे विधानसभेत एकनाथ शिंदे यांच्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आटोपतं घ्या असं सांगितलं, तसेच सगळं सांगत बसू नका असेही मस्करीत सांगून टाकलं.
पाहा व्हिडिओ
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 14, 2022
चौथा प्रसंग-मुख्यमंत्र्यांसोमरचा माईकच घेतला
यातला चौथा प्रसंग तर सर्वात जास्त चर्चेत राहिला. कारण पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देत असताना फडणवीस यांनी एकनाथ शिंदे समोरचा थेट माइकच उचलून घेतला आणि हेच शिवसेना आहेत म्हणून सांगत पुन्हा माईक तिकडे ठेवला. मात्र यावेळी मुख्यमंत्री हे बोलत होते आणि मुख्यमंत्री बोलत असताना असा माईक घेणं किती योग्य आहे? अशी टीका विरोधकांकडून होऊ लागली.
पाहा व्हिडिओ
पाचवा प्रसंग-मुख्यमंत्र्यांना चिठ्ठी दिली
यातला आजचा प्रसंग तर सर्वांचा लक्ष वेधून गेला, कारण पत्रकार परिषदेत बोलत असताना एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस यांच्याकडून थेट चिठ्ठी आली. त्यानंतर आता महाविकास आघाडीतील नेत्यांनी यावरूनच भाजप आणि शिंदे सरकारला डिवचायला सुरू केलं आहे.