महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष किती काळ चालणार? सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी 8 ऐवजी 12 ऑगस्टला होण्याची शक्यता- सूत्र
सत्ता संघर्षावरती सुप्रीम कोर्टात काही महत्त्वाच्या सुनावणी पार पडत आहेत. मात्र आता आठ ऑगस्टला होणारी सुनावणी हे 12 ऑगस् ला जाण्याची शक्यता विश्वासनीय सूत्रांनी वर्तवली आहे.
नवी दिल्ली : राज्यातलं ठाकरे सरकार (Uddhav Thackeray) पडून राज्यात नवं सरकार येऊन जवळपास 36 दिवस उलटून गेलेत. मात्र तरीही अजून याच सरकारचा मंत्रिमंडळ (Cm Eknath Shinde) विस्तार झाला नाही, यावरून विरोधकांकडून सडकून टीका होत आहे. तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टातील (Supreme Court) ठाकरेंची शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यातील लढाई ही सुरूच आहे. कारण एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून एकापाठोपाठ एक पाच याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. तसेच एकनाथ शिंदे यांच्या सोबतच्या सोळा आमदारांचे निलंबन करावे अशी ही मागणी करण्यात आली. त्याच सत्ता संघर्षावरती सुप्रीम कोर्टात काही महत्त्वाच्या सुनावणी पार पडत आहेत. मात्र आता आठ ऑगस्टला होणारी सुनावणी हे 12 ऑगस् ला जाण्याची शक्यता विश्वासनीय सूत्रांनी वर्तवली आहे.
आमदारांना अपत्र ठरवण्याची मागणी
एकनाथ शिंदे यांच्या गटातील 16 आमदारांनी पक्षाच्या आदेशाचा पालन केलं नाही, त्यामुळे त्यांना अपात्र ठरवा तसेच आमदारांचा एक गट पक्ष कुणाचा हे ठरवू शकत नाही. असा युक्तीवाद करत शिवसेनेकडून सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात आलेली आहे. तसेच शिवसेनेचं निवडणूक चिन्ह म्हणजेच धनुष्यबाण हाही शिवसेनेचाच राहणार आणि शिवसेना ठाकरे यांचीच राहणार असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात येतोय.
शिंदे गटाचाही शिवसेनेवर दावा
तर दुसरीकडे आमच्याकडे दोन तृतीयांश आमदारांचं बहुमत आहे. त्यामुळे शिवसेना ही आमचीच आहे, आम्ही म्हणजेच बाळासाहेब ठाकरेंची खरे शिवसेना असा दावा एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून करण्यात आलाय. सुप्रीम कोर्टातील युक्तिवादानंतर विजयाचे दावे ही दोन्ही बाजूने करण्यात येत आहेत, मात्र अद्याप तर यावरती अंतिम निर्णय आलेला नाही, सुप्रीम कोर्टात यावर सुनावण्या सुरूच आहेत, आता पुढच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलेला आहे. तसेच या राज्यातला हा संत्तासंघर्ष कधी संपणार आणि राज्याला नवं मंत्रिमंडळ कधी मिळणार असाही सवाल अजून अनुपस्थित आहे. या सुनावणीवरतीच या प्रश्नाचेही उत्तर अवलंबून असणार आहे.
कोर्टातल्या निर्णयामुळे विस्ताराला विलंब?
तसेच सुप्रीम कोर्टातील निर्णयाला घाबरूनच एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळ विस्तार करत नाहीत. अशी टीकाही सध्या विरोधकांकडून होत आहे, मात्र आम्ही लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करू असे वारंवार एकनाथ शिंदे आणि भाजप नेत्यांकडून सांगण्यात येत आहे, मात्र सध्या तरी हा मुहूर्त अजून उजाडलेला नाहीये, अजित पवारही सध्या विस्तारावरून आक्रमक झाले आहेत.