‘उद्धव ठाकरे आणि अजित पवार चांगलं काम करतायत, पण भाजपला ‘ती’ संधी द्यायला नको होती’

अलीकडच्या काळातील राज्यातील घटनांमुळे महाराष्ट्राचं नाव राष्ट्रीय स्तरावर बदनाम झालं आहे. | Sanjay Raut Ajit Pawar

'उद्धव ठाकरे आणि अजित पवार चांगलं काम करतायत, पण भाजपला 'ती' संधी द्यायला नको होती'
संजय राऊत
Follow us
| Updated on: Mar 29, 2021 | 10:40 AM

मुंबई: राज्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर नेते चांगलं काम करत आहेत. पण त्यांनी भाजपला सरकारविरोधात संशयाचे वातावरण निर्माण करण्याची संधी द्यायला नको होती, असे मत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केले. (Sanjay Raut on Mahavikas Aghadi govt and BJP)

ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी ‘सामना’तून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेविषयी भाष्य केले. यामध्ये कोणावरही निशाणा साधायचा प्रश्नच येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही एका वृत्तपत्राला मुलाखत देताना ही बाब मान्य केली. अलीकडच्या काळातील राज्यातील घटनांमुळे महाराष्ट्राचं नाव राष्ट्रीय स्तरावर बदनाम झालं आहे. सामाजिक, राजकीय आणि सर्वच क्षेत्रांमध्ये राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राची एक प्रतिष्ठा आहे. ही प्रतिष्ठा या सगळ्या घटनांमुळे डागाळल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

तसेच अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या टीकेवरून अजित पवार मला काही बोलले असतील तर ते बोलू देत, असेही राऊत यांनी सांगितले. सरकार हे हलतडुलत राहिलं पाहिजे, त्यामध्ये जिवंतपणा हवा. थोडी टीकाटिप्पणी ही व्हायलाच हवी. पण महाविकासआघाडी सरकारला कोणताही धोका नाही, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

‘विरोधकांनी आरोपांचे रंग उधळू नयेत, सरकार पडणार नाही’

महाराष्ट्रात तीन पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले असले तरी आमच्याकडे बहुमत आहे. त्यामुळे आम्हाला निर्णय घ्यायचा पूर्ण अधिकार आहे. विरोधक हे बेरंग आहेत. त्यांनी पुढील साडेतीन वर्षे आमच्याशी प्रेमाने होळी खेळावी. उगाच आरोपांचे रंग उधळू नयेत. तसेच सरकारच्या पायात तंगड अडकवण्याचा प्रयत्न करु नये. हे सरकार पडणार नाही, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

पवार-शहांची भेट झाली तर चूक काय?

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजपचे नेते अमित शहा यांच्यात झालेल्या भेटीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. भेट झाली तर होऊ दे. कामानिमित्त भेट झाली तर चूक काय?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

पवार-शहांची भेट झाली असेल तर होऊ दे. बंद खोलीतील मुद्दे बाहेर येतात. कामानिमित्त दोन नेत्यांची भेट झाली असेल तर होऊ द्या, असं राऊत यांनी सांगितलं. या भेटीत सस्पेन्स असं काय आहे. दोन नेत्यांनी भेटणं वावगं काय? गृहमंत्र्यांकडे पवारांचं काही काम असू शकतं, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या : 

महाविकासआघाडीत मीठाचा खडा टाकू नका; संजय राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर अजित पवारांचा इशारा

…म्हणून शरद पवारांनी अनिल देशमुखांकडे गृहमंत्रीपद सोपवले, शिवसेनेचा गौप्यस्फोट

शरद पवारांनी चर्चा करुन सर्वांना जबाबदारी दिली, नवाब मलिकांचे वक्तव्य

(Sanjay Raut on Mahavikas Aghadi govt and BJP)

एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.