येत्या काही दिवसात मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दिसेल, उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; हिंदुत्वावरून भाजपला घेरलं
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लवकरच महाराष्ट्र पिंजून काढण्याचे संकेत दिले आहेत. आपण शिवसंपर्क अभियान गेल्यावेळीच राबवणार होतो. पण कोरोनाची लाट आली. त्यानंतर माझ्या मानेचं दुखणं उद्बवलं. मात्र आता आपल्याला जोमाने कामाला लागायचं आहे.
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी लवकरच महाराष्ट्र (maharashtra) पिंजून काढण्याचे संकेत दिले आहेत. आपण शिवसंपर्क अभियान गेल्यावेळीच राबवणार होतो. पण कोरोनाची लाट आली. त्यानंतर माझ्या मानेचं दुखणं उद्बवलं. मात्र आता आपल्याला जोमाने कामाला लागायचं आहे. येत्या काही दिवसात मीही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दिसेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. शिवसेना खासदार आणि जिल्हाप्रमुखांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी हे विधान केल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसेच मुख्यमंत्र्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपला घेरलं. भाजपचं (bjp) हिंदुत्व हे केवळ राजकारणासाठी आहे. सत्तेसाठी मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत गेले होते हे विसरलात का? असा सवाल करतानाच सरकारचा संबंध दाऊदशी जोडणं चुकीचं असून विरोधकांच्या कुरापती ओळखायला शिका असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
येत्या 22 मार्चपासून शिवसेनेचं शिवसंपर्क अभियान सुरू होणार आहे. या अभियानांतर्गत शिवसेनेचे खासदार आणि जिल्हाप्रमुख गावागावात जाऊन शिवसेनेची बांधणी करणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे खासदार आणि जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण लवकरच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरणार असल्याचं स्पष्ट केलं. दोन वर्षावर लोकसभा निवडणुका आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवसैना पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचनाही दिल्या.
विरोधकांना सडेतोड उत्तर द्या
राज्यात एकामागोमाग एक घटना घडत आहेत. या सर्वांना आपण तोंड देत आहोत. मला एका जागी बसावं लागत आहे. पुण पुढच्या काही दिवसात मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दिसेल. तुमची साथ आहे. त्यामुळे एका ठिकाणी बसून राज्याचे काम पुढे नेत आहे. महाविकास आघाडीचे निर्णय लोकांपर्यत पोहोचवा. विरोधकांना सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न करा, असं आवाहनही त्यांनी केलं.
भाजपचं हिंदुत्व राजकारणासाठी
भाजपचं हिंदुत्व राजकारणासाठी आहे. आपलं हिंदुत्व हे देशाच्या हिताचं आहे. उत्तर प्रदेशात भाजपच्या जागा कमी झाल्या आहेत. याकडे दुर्लक्ष करू नका. विरोधकांच्या कुरापती ओळखायला शिकाॉ. विरोधकांचा डाव हाणून पाडा, असंही त्यांनी सांगितलं.
एमआयएम सोबत युती नाहीच
यावेळी त्यांनी एमआयएम सोबत कोणतीही युती होणार नाही, असं स्पष्ट केलं. एमआयएम ही भाजपची बी टीम आहे. त्यामुळे त्यांच्याशी युती करण्याचा प्रश्नच येत नाही, असं सांगत उद्धव ठाकरे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचा प्रस्ताव धुडकावून लावला.
शिवसंपर्क अभियानाची जिल्हानिहाय जबाबदारी
संजय राऊत – नागपूर अरविंद सावंत- यवतमाळ श्रीकांत शिंदे – गडचिरोली गजानन कीर्तिकर- अमरावती खासदार हेमंत पाटील- अकोला संजय जाधव – बुलढाणा खासदार प्रताप जाधव- वाशीम प्रियांका चतुर्वेदी- भंडारा खासदार कृपाल तुमाणे- वर्धा
संबंधित बातम्या:
Maharashtra News Live Update : भाजप पाकव्यात काश्मीर भारताला कधी जोडणार ते पाहावं लागेल – संजय राऊत
आघाडीची ऑफर हे तर ‘जलील’ षडयंत्र; Sanjay Raut यांची खोचक टीका