LIVE : रामलल्ला दर्शनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लखनौमार्गे मुंबईकडे रवाना

| Updated on: Mar 07, 2020 | 5:06 PM

महाविकासआघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (7 मार्च) अयोध्या दौऱ्यावर (CM Uddhav Thackeray Ayodhya) आहेत.

LIVE : रामलल्ला दर्शनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लखनौमार्गे मुंबईकडे रवाना
Follow us on

मुंबई : महाविकासआघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (7 मार्च) अयोध्या दौऱ्यावर (CM Uddhav Thackeray Ayodhya) आहेत. शिवसेनेकडून अयोध्येत जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंसोबत शिवसेनेचे सर्व मंत्री, खासदार, आमदार, अनेक नेते आणि पदाधिकारीही अयोध्येला रवाना झाले आहेत.

LIVE UPDATE 

[svt-event title=”जय सियाराम! म्हणत आदित्य ठाकरेंकडून अयोध्या भेटीवर भाष्य” date=”07/03/2020,5:04PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”रामलल्ला दर्शनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लखनौमार्गे मुंबईकडे रवाना” date=”07/03/2020,5:01PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”रामलल्ला दर्शनानंतर उद्धव ठाकरे लखनौला रवाना होणार” date=”07/03/2020,4:40PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून सहकुटुंब रामलल्लांचं दर्शन” date=”07/03/2020,4:30PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत पोहोचले ” date=”07/03/2020,1:16PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”शिवसैनिकांकडून नाशिकच्या काळाराम मंदिरात महाआरती” date=”07/03/2020,1:08PM” class=”svt-cd-green” ] शिवसैनिकांच्या वतीने नाशिकच्या काळाराम मंदिरात महाआरती , शिवसैनिक नाशिकमध्ये महाआरती करणार, शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार [/svt-event]

[svt-event title=”थोड्यात वेळात उद्धव ठाकरे अयोध्येला पोहोचणार” date=”07/03/2020,1:07PM” class=”svt-cd-green” ] अयोध्येत कडक पोलीस बंदोबस्त तैनात, शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील,संजय राठोड, कॉंग्रेसचे मंत्री सुनील केदार अयोध्येत दर्शनासाठी दाखल, थोड्यात वेळात उद्धव ठाकरे अयोध्येला पोहोचणार [/svt-event]

[svt-event title=”काँग्रेस नेते आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील अयोध्येत, ” date=”07/03/2020,1:04PM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”उद्धव ठाकरे राम मंदिर निर्माणावर महत्त्वाची भूमिका जाहीर करणार, संजय राऊत यांची माहिती” date=”07/03/2020,11:11AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”आम्ही सरड्यासारखे रंग बदलत नाही : अरविंद सावंत” date=”07/03/2020,11:10AM” class=”svt-cd-green” ] सरकार स्थापन होण्यापूर्वीही उद्धव ठाकरे अयोध्येत आले होते. आज मुख्यमंत्री म्हणून येत आहेत. आमचं हिंदुत्व कायम असून, आम्ही सरड्यासारखे रंग बदलत नाही. राममंदिरासाठी शिवसेनेची भूमिका कायम महत्त्वाची राहिली आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी दिली. [/svt-event]

[svt-event title=”रामाचं मंदिर उभारणीचं काम लवकरच, नीलम गोऱ्हेंची प्रतिक्रिया” date=”07/03/2020,11:04AM” class=”svt-cd-green” ] अयोध्येत राम जन्मभूमीत रामाचं मंदिर उभारणीचं काम लवकरच सुरु होईल, इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी तीर्थक्षेत्र म्हणून सुविधा मिळायला हव्यात. त्यामुळे महाराष्ट्र भवन येथे झाले पाहिजे यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी दिली. [/svt-event]

[svt-event title=” मुख्यमंत्र्यांसह आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे विमानतळाकडे रवाना” date=”07/03/2020,10:50AM” class=”svt-cd-green” ]

श्री राम नगरी अयोध्येत उद्धव ठाकरे यांच्या (CM Uddhav Thackeray Ayodhya) स्वागतासाठी फैजाबाद आणि अयोध्येत सर्वत्र बॅनरबाजी पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यामुळे अयोध्येत भगवं वातावरण पाहायला मिळत आहे.

ग्राऊंड रिपोर्ट – अयोध्या : ‘बालासाहब का बेटा आ रहा हैं’

असा असेल अयोध्या दौरा?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज दुपारी दोन वाजता लखनऊ विमानतळावर पोहोचतील. त्यानंतर ते गाडीने लखनऊ ते अयोध्या प्रवास करतील. दुपारी 3.30 वाजता अयोध्येत त्यांची पत्रकार परिषद होईल.

त्यानंतर सायंकाळी 4.30 वाजता उद्धव ठाकरे रामललाचे दर्शन घेतील. त्यानंतर सायंकाळी 5.30 च्या सुमारास ते पुन्हा लखनऊकडे रवाना होतील.

उद्धव ठाकरेंना अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही, अयोध्येतील महंतांची धमकी

कोरोनामुळे शरयू आरती स्थगित

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या तयारीसाठी गेल्या चार दिवसांपासून खासदार संजय राऊत अयोध्येसाठी रवाना झाले आहेत. शरयू आरतीचंही शिवसेनेनं नियोजन केलं होतं, पण कोरोना व्हायरसमुळे गर्दी टाळण्यासाठी उद्धव ठाकरे यांची शरयू आरती स्थगित करण्यात आली.

अयोध्येला जाताना हे लक्षात ठेवा, संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

संजय राऊतांकडून राममंदिर परिसराची पाहणी

खासदार संजय राऊत यांनीही काल (6 मार्च) राममंदिर परिसराची पाहणी केली. शिवाय, अयोध्येतील अनेक महंतांच्या भेटी घेतल्या. लक्ष्मणकिलाधीश यांच्यासह अनेक महंत उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्याचं स्वागत करत आहेत. तर, अयोध्येतील काही महंत उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्याला विरोध करत आहेत. शिवसेनं सत्तेत काँग्रेसची साथ सोडावी किंवा हिंदू राष्ट्रनिर्मितीबाबतची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी तपस्वी छावणीच्या महंतांनी केली (CM Uddhav Thackeray Ayodhya) आहे.