सुशांत आत्महत्या प्रकरणाच्या तपासात पारदर्शकता ठेवा, मुख्यमंत्र्यांच्या पोलिस अधिकाऱ्यांना सूचना

| Updated on: Aug 03, 2020 | 10:43 AM

मुख्यमंत्र्यांनी तातडीने बोलावलेल्या बैठकीत कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासाची व्यवस्था, पाच ऑगस्टपासून मॉल तसेच इतर काही गोष्टी सुरु करण्याबाबतही आढावा घेतला

सुशांत आत्महत्या प्रकरणाच्या तपासात पारदर्शकता ठेवा, मुख्यमंत्र्यांच्या पोलिस अधिकाऱ्यांना सूचना
Follow us on

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासामध्ये पारदर्शकता ठेवा, चोख तपास करा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी ‘वर्षा’ बंगल्यावर पोलिस महासंचालक, पोलिस आयुक्त आणि मुख्य सचिव यांच्यासोबत घेतलेल्या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा केली. (CM Uddhav Thackeray directs transparency in Sushant Singh Rajput Suicide Case investigation)

मुख्यमंत्र्यांनी तातडीने बोलावलेल्या बैठकीत कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासाची व्यवस्था, पाच ऑगस्टपासून मॉल तसेच इतर काही गोष्टी सुरु करण्याबाबतचा आढावा घेतला. शासकीय निवासस्थान ‘वर्षा’वर झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी पोलिस अधिकाऱ्यांशी सविस्तर संवाद साधला.

हेही वाचा : पाटण्याचे एसपी बळजबरीने क्वारंटाईन, बिहारच्या पोलिस महासंचालकांचा आरोप

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा आढावा घेताना तपासामध्ये पारदर्शकता ठेवण्याबरोबरच चोख तपास करण्याच्या सूचनाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केल्याचे समजते.

सुशांतसिंह प्रकरणावरुन राजकारण तापले असून बिहार सरकारने महाराष्ट्रातील पोलिसांना लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. याशिवाय सुशांतसिंहच्या घरी झालेल्या कथित पार्टीत राज्य मंत्रिमंडळातील एक मंत्रीही सहभागी असल्याच्या पोस्ट सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवरही या बैठकीत चर्चा झाल्याचे कळते.

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईला आलेल्या बिहारच्या एसपींना बळजबरीने क्वारंटाईन केल्याचा आरोप होत आहे. पाटणा शहराचे पोलिस अधीक्षक विनय तिवारी यांनी बीएमसीने जाणूनबुजून क्वारंटाईन केल्याचा आरोप बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी व्हिडीओ ट्वीटद्वारे केला आहे. (CM Uddhav Thackeray directs transparency in Sushant Singh Rajput Suicide Case investigation)

चाकरमान्यांच्या प्रश्नावरही उद्धव ठाकरेंची चर्चा

दरम्यान, गणेशोत्सविनिमित्त मोठ्या प्रमाणावर चाकरमानी कोकणात जात असल्याने त्यांच्या ई-पासची व्यवस्था, वाहतुकीची व्यवस्था याचा उद्धव ठाकरेंनी आढावा घेतला. राज्य सरकारचा पाच ऑगस्टपासून मॉल सुरु करण्याचा विचार असून त्यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला.


संबंधित बातम्या :

बिहार पोलीस सुशांतच्या मॅनेजरच्या आत्महत्येचीही चौकशी करणार, 48 तासात मोठ्या कारवाईची शक्यता

रियाने सुशांतच्या बँक खात्यातील 3 कोटी रुपये खर्च केल्याचं उघड

(CM Uddhav Thackeray directs transparency in Sushant Singh Rajput Suicide Case investigation)