मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं विधानसभेत दमदार भाषण, वाचा 10 महत्त्वाचे आणि मोठे मुद्दे

महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडत आहे. आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. पहिले दोन दिवस विरोधकांनी जागवल्यावर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलायला उभे राहिले. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी टॉप गिअर चाकत विरोधकांचे हल्ले परतावून द्यायला सुरुवात केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं विधानसभेत दमदार भाषण, वाचा 10 महत्त्वाचे आणि मोठे मुद्दे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं विधानसभेत भाषण
Follow us
| Updated on: Mar 03, 2021 | 4:40 PM

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडत आहे. आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. पहिले दोन दिवस विरोधकांनी जागवल्यावर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलायला उभे राहिले. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी टॉप गिअर चाकत विरोधकांचे हल्ले परतावून द्यायला सुरुवात केली. पहिल्यांदा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना कोपरखळ्या, नंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना एक एक करुन प्रत्युत्तरं, कोव्हिडच्या काळातली सरकारची कामगिरी अशा मोठ्या मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत भाषण केलं. (CM Uddhav Thackeray full speech today during Maharashtra budget session talks on covid19 vaccine, Marathi language, savarkar, Devendra Fadnavis Narendra Modi stadium, sudhir mungantiwar)

1) सुधीर मुनगंटीवारांच्या भाषणांनी चंद्रकांतदादांना आणि फडणवीसांना भिती वाटतीय.. आमचं कसं होणार, अशी त्यांच्या मनात भावना आहे. कला जिवंत असली पाहिजे… तिला मरु देऊ नका…

2) विरोधकांची चर्चा ऐकून नटसम्राट पाहिल्याचा भास… मी आहे अथ्थेला, मी आहे हॅम्लेट…. असे चित्रपटातील संवाद म्हणत म्हणत मुख्यमंत्र्यांकडून विरोधकांची खिल्ली…

3) वल्लभाई पटेल यांचं नाव हटवून नरेंद्र मोदींचं नाव त्या स्टेडियमला दिलं आहे. आता त्या स्टेडियमवर भारत प्रत्येक मॅच जिंकणार, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

4) मराठी ही छत्रपत्रींती भाषा, अभिजात दर्जा द्या म्हणून आम्ही दिल्ली दरबारी जायचं का? मराठी भाषा काय भिकारी आहे का?, मुख्यमंत्री भडकले

5) होय आम्ही औरंगाबादचं संभाजीनगर करणारच, पण तुम्ही सावरकरांना भारतरत्न का देत नाहीत?, मुख्यमंत्र्यांचा बाजपला सवाल

6) महाराष्ट्रात कोरोनाचा एकही रुग्ण लपवलेला नाही वा मृत्यूही नाही, विरोधकांच्या कोरोनावरच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचं उत्तर

7) बंद दाराआड देखील आम्ही कधी खोटेपणा केलेला नाही, खोटेपणा करणं आमच्या रक्तात नाही

8) कोव्हिड काळात राज्याला मदत करण्याऐवजी दिल्लीला फंडाचं आवाहन केलं, आणि हिशेब आमच्याकडे मागताय?, दिल्लीच्या पीएम केअर फंडाचा हिशेब कोण देणार

9) गॅसची हजारी आणि पेट्रोलची शंभरी, इंधन दरवाढीवरुन मुख्यमंत्र्यांचा टोला

10) शेतकऱ्याच्या मार्गात खिळे आणि चीन दिसले की पळे…. बांगलादेशी पाकिस्तानी सीमारेषा उघड्या.. शेतकरी आंदोलनाला छावणीचं रुप… शेतकरी काय अतिरेकी आहे काय?

11) हमीभाव नाही तर हमखास भाव देणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

12) माझं आजोळ माझ्यापासून तोडू नका, विदर्भ वेगळा होणार नाही किंबहुना होऊ देणार नाही

13) शरजील उस्मानीला अटक केल्याशिवाय राहणार नाही

14) कोव्हिड काळ असून देखील महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक आणलीय

15) जिकडे आम्ही कमी पडलो, तिकडे जरुर सूचना करा पण महाराष्ट्राला बदनाम करु नका

(CM Uddhav Thackeray full speech today during Maharashtra budget session talks on covid19 vaccine, Marathi language, savarkar, Devendra Fadnavis Narendra Modi stadium, sudhir mungantiwar)

हे ही वाचा :

सुधीरभाऊंचं भाषण पाहिलं आणि नटसम्राट आठवला, पण कुणी किंमत देता का किंमत अशी स्थिती, मुख्यमंत्र्यांचे फटकारे

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.