प्रजासत्ताक दिनी शिवभोजन थाळीचा शुभारंभ, कोणकोणत्या जिल्ह्यात शिवभोजन सुरु?
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ठाकरे सरकारच्या महत्त्वकांक्षी शिवभोजन थाळीचा अनेक ठिकाणी शुभारंभ करण्यात (Shiv Bhojan Thali Start) आला.
मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ठाकरे सरकारच्या महत्त्वकांक्षी शिवभोजन थाळीचा अनेक ठिकाणी शुभारंभ करण्यात (Shiv Bhojan Thali Start) आला. मुंबई उपनगर, पुणे, नाशिक, बुलडाणा, सोलापूर, वाशिम यांसह अनेक ठिकाणी शिवभोजन थाळी सुरु करण्यात आली. राज्यात जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात या योजनेचा शुभारंभ (Shiv Bhojan Thali Start) केला.
मुंबई उपनगरात आदित्य ठाकरेंच्या हस्ते शुभारंभ
मुंबई उपनगरातील महसूल कर्मचारी उपहारगृहामध्ये नागरिकांसाठी शिवभोजन थाळी या योजनेचे उद्धाटन करण्यात आले. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ही योजना सुरु करण्यात आली. यामुळे आता उपनगरातील नागरिकांना 10 रुपयांत सकस आहार मिळणार आहे.
पोटाला जात, पात, धर्म आणि आर्थिक स्थितीचे निकष न लावता सर्वांना स्वस्त आणि दर्जेदार आहार मिळावा हेच या योजनेचे उद्दिष्ट आहे असे ट्विट आदित्य ठाकरेंनी केलं आहे.
आज मुंबई उपनगर महसूल कर्मचारी उपहारगृह येथे नागरिकांसाठी १० रुपयांत आहार असलेल्या ‘शिवभोजन’ या योजनेचे उद्घाटन केले.
पोटाला जात, पात, धर्म आणि आर्थिक स्थितीचे निकष न लावता सर्वांना स्वस्त आणि दर्जेदार आहार मिळावा हेच या योजनेचे उद्दिष्ट आहे. pic.twitter.com/PQVn7uweUa
— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 26, 2020
ठाण्यातही शिवभोजन थाळी सुरु
मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यातील गोरगरीब जनतेला अल्पदरात म्हणजे केवळ 10 रुपयांत पोटभर जेवण उपलब्ध व्हावे या उद्देशाने सुरू केलेल्या शिवभोजन योजना सुरु करण्यात आली . ठाण्यातील लोकमान्य नगर आणि यशोधन नगर येथील केंद्रांचा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उद्घाटन करण्यात आले.
मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या संकल्पनेतून राज्यातील गोरगरीब जनतेला अल्पदरात म्हणजे केवळ १०रुपयांत पोटभर जेवण उपलब्ध व्हावे या उद्देशाने सुरू केलेल्या #शिवभोजन योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या लोकमान्य नगर व यशोधन नगर येथील केंद्रांचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. pic.twitter.com/dcgOdGs9gE
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 26, 2020
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील मनीषा नगरमध्ये नागरिकांसाठी “शिवभोजन” योजनेचे उदघाटन केले. यावेळी त्यांनीही स्वतः भोजनाचा स्वाद घेतला. गरीब आणि गरजू जनतेला फक्त दहा रुपयात दर्जेदार आहार भेटावं. हेच आमच्या महाविकास आघाडी सरकारचे उद्दिष्ट आहे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
“शिवभोजन”
होय हे आपलं सरकार आहे. pic.twitter.com/ql79SOcjWp
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 26, 2020
पुण्यात दर दिवसाला 150 थाळी
पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या योजनेचा शुभारंभ केला. पुण्यात सामान्य माणसाला पोटभर जेवणासाठी ही योजना सुरु करण्यात आली. दर दिवसाला 100 ते 150 थाळी देण्यात येतील. यावेळी काही त्रुटी राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र वेळोवेळी माहिती घेऊन यात सुधारणा करु असे अजित पवार म्हणाले.
पुण्यात शिवभोजन थाळीचे उद्धाटन केल्यानंतर काही मिनिटांतच जेवणासाठी नागरिकांनी रांग लावली. शिवभोजन योजनेला पहिल्या दिवशी चांगला (Shiv Bhojan Thali Start) प्रतिसाद मिळत आहे.
नाशिकमध्ये 4 शिवभोजन केंद्र
नाशिकमध्ये अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शिवभोजन केंद्राचे उद्धाटन करण्यात आले. नाशिक शहरात एकूण 4 केंद्रात शिवभोजन थाळी मिळणार आहे. प्रत्येक केंद्रात एका दिवसात 150 गरजूंना भोजन मिळेल.
बीडमध्येही शिवभोजन योजनेचा शुभारंभ
बीड जिल्ह्यात महाविकास आघाडी सरकारच्या शिवभोजन योजनेचा शुभारंभ केला. यामुळे 10 रुपयांत पौष्टीक जेवणाचा गोरगरीब जनेला पोटभर जेवण मिळणार आहे.
अन्न हे पूर्णब्रह्म!
प्रजासत्ताक दिनी बीड जिल्ह्यात महाविकास आघाडी सरकारच्या #शिवभोजन योजनेचा शुभारंभ केला. अवघ्या १० रुपयांत मिळणाऱ्या या पौष्टिक जेवणाचा गोरगरीब जनतेला नक्कीच फायदा होईल.#RepublicDay2020 #RepublicDay pic.twitter.com/NmrT24a22X
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 26, 2020
सोलापूर बस स्थानकात शिवभोजनालय कार्यालय
सोलापुरात पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शिव भोजनालयाचे उद्घाटन केले. सोलापूर बस स्थानकात शिव भोजनालय सुरु करण्यात आले. सर्वसामान्य जनता आणि गरजू लोकांसाठी हे शिव भोजनालय असल्याची प्रतिक्रिया दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
वाशिममध्ये पालकमंत्र्यांकडून थाळी वाटप
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महत्त्वकांक्षी शिव भोजनालय उद्घाटन वाशिममध्ये करण्यात आले. वाशिमचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते हे उद्धाटन करण्यात आलं. पालकमंत्र्यांनी स्वतः लाभार्थ्यांना थाळी वाटप करून सर्वांचे मने जिंकली.
वाशिम मधील रेल्वे स्थानक परिसरात 125 थाळीचे शिवभोजनालय सुरु करण्यात आलं आहे. तर 100 थाळीचे जिल्हा ग्रामीण रुग्णालय परिसरात सुरू करणयात आलं आहे. याचा गोरगरीब जनतेला फायदा होईल अशी आशा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त (Shiv Bhojan Thali Start) केली.
सांगलीत शिवभोजन थाळी सुरु
सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी शिवभोजन थाळी सुरु करण्यात आली. सर्वसामान्य जनता आणि गरजू लोकांसाठी हे शिव भोजनालय सुरु करण्यात आलं आहे. यामुळे आता सर्वसामान्यांना 10 रुपयात थाळी मिळणार आहे.
#सांगली पालकमंत्री जयंत पाटील जी यांच्या हस्ते #शिवभोजन योजनेचा शुभारंभ !#वचनपूर्ती #महाविकासआघाडी @OfficeofUT #mahavikasaghadi pic.twitter.com/c93eSwnQa0
— Sachin Patil (@Sachinshivsena) January 26, 2020
वर्ध्यात दोन शिवभोजनालय
वर्धा शहरात जिल्हा सामान्य रुग्णालयात या योजनेला शुभारंभ करण्यात आलं आहे. रेल्वे स्थनाकासमोर 10 रुपयांत गरजूना जेवण मिळणार आहे. शहराच्या दोन्ही शिवभोजनालयात दररोज 100 लोकांना याचा लाभ देण्यात येणार आहे. राज्यात कुठलाही गरीब व्यक्ती उपाशी झोपता कामा नये या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली आहे. ही योजना म्हणजे राज्य सरकारचा गोर गरिबांसाठी असलेला प्रेमाचा ओलावा असल्याचं मत पालकमंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केलं आहे.