शिवसेना आमदाराचा प्रश्न, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं विधिमंडळात पहिलं उत्तर

शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी अकोल्यातील शिवणी विमानतळाच्या विस्तारीत धावपट्टीचा मुद्दा सदनात मांडला होता

शिवसेना आमदाराचा प्रश्न, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं विधिमंडळात पहिलं उत्तर
फाईल फोटो
Follow us
| Updated on: Dec 18, 2019 | 11:00 AM

नागपूर : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पहिलंच अधिवेशन होत आहे. नागपुरात होत असलेल्या सहादिवसीय हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत आमदाराने उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर दिलं. उद्धव ठाकरे यांचं हे विधिमंडळातील पहिलंच उत्तर (CM Uddhav Thackeray in Vidhan Parishad) ठरलं आहे.

शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी अकोल्यातील शिवणी विमानतळाच्या विस्तारीत धावपट्टीचा मुद्दा सदनात मांडला. विमानतळासंबंधीचा हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचं बाजोरिया यांनी सांगितलं. गोपीकिशन बाजोरिया हे अकोला-वाशिम-बुलडाणा मतदारसंघातून शिवसेनेचे विधानपरिषदेवरील आमदार आहेत.

‘शिवणीमधील विमानतळच्या विस्तारित धावपट्टीच्या प्रश्नाबाबत मी माहिती घेतली आहे. मी माझ्या दालनात बैठक घेतो आणि या प्रश्नावर मार्ग काढतो’, असं उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं. आता, शिवणीतील विस्तारीत धावपट्टीच्या  प्रश्नावर ठाकरे सरकार काय तोडगा काढणार, याकडे अकोलावासियांचं लक्ष लागलं आहे.

भाजप आमदार नागपुरात संघाच्या ‘शाळे’त, नितेश राणे, विखे, गणेश नाईकही हजर

हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. सोमवारी सावकरांच्या मुद्द्यावर पहिला दिवस विरोधकांनी गाजवला होता. त्यानंतर काल शेतकरी कर्जमाफीसह इतर मुद्द्यांवर विरोधकांनी गोंधळ घातल्याने कामकाज तहकूब झालं. भाजपने विधान भवन परिसरात शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरुन जोरदार घोषणाबाजी केली.

दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज आमदारांशी संवाद साधणार आहेत. शरद पवार यांच्या नागपुरातील ‘देवगिरी’ निवासस्थानी ते आमदारांशी संवाद साधणार आहेत. भाजप आक्रमक झाल्याने आता पवार आपली खेळी खेळणार आहेत. ते आज केवळ राष्ट्रवादीच्या आमदारांशी संवाद साधून नेमकी काय रणनीती आखणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

CM Uddhav Thackeray in Vidhan Parishad

'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.