एका गाडीत बसलो नसलो, तरी एकाच स्टेशनवर एकत्र आलो : उद्धव ठाकरे

नागपूर ही राज्याची उपराजधानी आहे. त्यामुळे त्याला मी कधी मागे पडू देणार नाही," असेही उद्धव ठाकरे (Nagpur Metro inauguration Uddhav Thackeray) म्हणाले.

एका गाडीत बसलो नसलो, तरी एकाच स्टेशनवर एकत्र आलो : उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Jan 28, 2020 | 1:43 PM

नागपूर : बहुप्रतिक्षित लोकमान्यनगर ते बर्डी या अ‍ॅक्वामार्गावर मेट्रोच्या सेवेचे लोकापर्ण आज (28 जानेवारी) (Nagpur Metro inauguration Uddhav Thackeray)  करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून प्रकल्पाचे उद्धाटन केले. हे उद्धाटन झाल्यानंतर दुपारी 2 पासून प्रवासी फेऱ्या सुरु होणार आहेत. फक्त 20 मिनिटात 20 रुपयात नागपूरकरांना सीताबर्डी ते लोकमान्यनगर असा प्रवास करता येणार आहे.

या मेट्रोचे उद्धाटन करण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी भाषण केले. यावेळी भाषणाची सुरुवात करताना उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख माझे मित्र म्हणून केला. “आपण एका गाडीत बसलो नसलो, तरी एका स्टेशनवर एकत्र आलो आहे. नागपूर मेट्रोसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांना धन्यवाद,” असे नितीन गडकरींबाबत उद्धव ठाकरे म्हणाले.

“मी कधी श्रेय घेतलं नाही, आम्हाला श्रेय घ्यायचं नाही. आम्हाला फक्त लोकांचा आशिर्वाद पाहिजे. याचं श्रेय जनतेला जातं. नागपुरात सुरु असलेले प्रकल्प कधीच थांबवले जाणार नाही. नागपूर ही राज्याची उपराजधानी आहे. त्यामुळे त्याला मी कधी मागे पडू देणार नाही,” असेही उद्धव ठाकरे (Nagpur Metro inauguration Uddhav Thackeray) म्हणाले.

या दरम्यान उद्धव ठाकरेंनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचेही आभार मानले. “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न असलेल्या मुंबई-पुणे एक्सप्रेस पूर्ण करण्याचा काम नितीन गडकरींनी केले. ते अत्यंत अभ्यासू माणूस असून ते भाषण सुद्धा अभ्यासपूर्वक करतात,” असेही ते म्हणाले.

“एखादं स्वप्न पाहण ते पूर्ण करणं यात फार फरक असतो. नुसती माहिती वाचून दाखवणं याला भाषण म्हणत नाहीत,” असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले.

“आपण जनतेचे सेवक आहोत, त्यामुळे माझी मेट्रो असं जे नाव दिले ते योग्य आहे. त्याचं मेट्रोचं लोकार्पण करत आहोत. मात्र प्रवास करताना त्याची स्वच्छता आणि निगा राखणं हे आपलं काम आहे. जर स्वच्छता आणि निगा राखली गेली तर माझ्या मुंबईची, नागपूरची आणि महाराष्ट्रातील मेट्रो बघण्यासाठी परदेशातून व्यक्ती येतील,” असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावेळी व्यक्त (Nagpur Metro inauguration Uddhav Thackeray) केला.

“नागपूर विमानतळाची निविदा आहे. ती लवकरच मार्गी लावू. तसेच राज्यातील प्रकल्पांसाठी केंद्राने लवकर मंजुरी द्याव्या. मी आणि गडकरी आपण जर दोघं ही समन्वय साधून राज्यासाठी काम करूया. दोन्ही सरकारने एकत्र येऊन काम करूया याचा राज्याला फायदा होईल. तसेच महाराष्ट्राचा विकास होईल,” असेही ते म्हणाले.

“नागपूरकरांच्या आशिर्वाद आणि शुभेच्छांची खूप गरज आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीतही विकासाची मेट्रो व्हावी. एकदा तरी मला या नागपूर मेट्रोतून प्रवास करायचा आहे,” असेही उद्धव ठाकरे (Nagpur Metro inauguration Uddhav Thackeray) म्हणाले

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.