उद्धव ठाकरेंकडून कर्जमाफीची घोषणा, आदित्य ठाकरे म्हणतात…

राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी होणार आहे. या कर्जमाफीसाठी कोणत्याही अटी नसल्याची माहिती अर्थमंत्री जयंत पाटील यांनी (farmer loan waiver)  सांगितलं.

उद्धव ठाकरेंकडून कर्जमाफीची घोषणा, आदित्य ठाकरे म्हणतात...
Follow us
| Updated on: Dec 21, 2019 | 8:58 PM

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा (farmer loan waiver aaditya thackeray comment)  केली. राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी होणार आहे. या कर्जमाफीसाठी कोणत्याही अटी नसल्याची माहिती अर्थमंत्री जयंत पाटील यांनी (farmer loan waiver)  सांगितलं. महाराष्ट्रातील शेतकऱ्याला कोणतेही हेलपाटे न घालता किंवा कोणतीही अट न घालता ही कर्जमाफी करण्यात येणार आहे. याबाबत आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना फडणवीस सरकारवर खरपूस टीका केली.

“महाविकासआघाडीने केलेल्या कर्जमाफीवर बोलण्याचा विरोधी पक्षाला कोणताही अधिकार नाही. नोटाबंदीनंतर काळा पैसा परत येईल, 15 लाख प्रत्येकाच्या खात्यात देऊ आणि यानंतर सांगतात की हा सर्व जुमला आहे. असे खोटारडेपणाचे ढोंग घेऊन फिरतात. लोकांशी ते खोट बोलतात जुमला करतात. या लोकांना कोणावरही बोलण्याचा अधिकार नाही.” अशी टीका आदित्य ठाकरेंनी (farmer loan waiver aaditya thackeray comment)  केली.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पीक कर्जमाफी, 10 रुपयांत शिवभोजन थाळी अशा घोषणा केल्या. तसेच विदर्भासाठीही महत्त्वपूर्ण घोषणा केली. एक नवीन आमदार म्हणून हे सर्व बघायला मिळणे याला भाग्य लागते.” असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

“विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा अनुभव नक्की चांगला होता. जे विषय मांडले गेले. ते खूप विषय पटलावर घेतले आहेत. मी गेले दहा वर्षे या ठिकाणी येतो. मात्र सभागृहात बसणं, एखाद्या विषयावर चर्चा करणे त्यात सहभागी होणे हा वेगळा अनुभव असतो,” असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

“आजची कर्जमाफी ही प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल. राज्यातील 90 ते 95 टक्के शेतकरी यात समाविष्ट आहेत. 2 लाखापर्यंत जे शेतकऱ्यांचे कर्जमाफीची घोषणा फार मोठी आहे. शेतकऱ्याच्या कर्जमाफीची आणि दहा रुपयांत थाळीची घोषणा झाली आहे. असेही आदित्य ठाकरेंनी यावेळी (farmer loan waiver aaditya thackeray comment)  स्पष्ट केले.”

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.