मातोश्री की वर्षा, पत्ता कुठे? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात….
"उद्धव ठाकरे यांना तुम्ही वर्षावर म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी राहायला जाणार का?" असा प्रश्न विचारला (CM Uddhav Thackeray varsha bungalow) होता. या प्रश्नाचे उद्धव ठाकरेंनी अत्यंत हसतखेळत उत्तर दिलं.
मुंबई : उद्धव ठाकरे यांनी नुकतंच मुख्यमंत्रिपदाचा पदभार (CM Uddhav Thackeray varsha bungalow) स्वीकारला. यानंतर दुसऱ्याच कॅबिनेट बैठकीत त्यांनी आरेला स्थगिती देण्याचा मोठा निर्णय घेतला. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन संवाद (CM Uddhav Thackeray varsha bungalow) साधला. या पत्रकार परिषदेत “उद्धव ठाकरे यांना तुम्ही वर्षावर म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी राहायला जाणार का?” असा प्रश्न विचारला (CM Uddhav Thackeray varsha bungalow) होता. उद्धव ठाकरेंनी या प्रश्नाचे अत्यंत हसतखेळत उत्तर दिलं. “मी वर्षावर फक्त कामासाठी जाणार” असे त्यांनी सांगितले.
“मातोश्रीबद्दल मी काही वेगळं सांगणार नाही. मातोश्रीचे महत्त्व काही वेगळं आहे. पण एखादी जबाबदारी घेतल्यानंतर ती पार पाडण्यासाठी जे गरजेचे असते म्हणजेच जनतेला भेटणं किंवा इतर ज्या काही गोष्टी त्या मी करणार. त्यामुळे वर्षावर जेव्हा जेव्हा कामासाठी जाणे गरजेचे आहे. तेव्हा मी तिथे जाणार,” असे उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या दुसऱ्याच कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील प्रस्तावित मेट्रो कारशेडला स्थगिती दिली. मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. “आरेला स्थगिती दिली आहे. जोपर्यंत याचा आढावा घेतला जात नाही तोपर्यंत हे काम सुरु राहणार नाही”, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Aarey car shed work suspended by CM Uddhav Thackeray ) यांनी (CM Uddhav Thackeray varsha bungalow) केली.
“आरे कारशेडला स्थगिती दिली. मला रात्रीची झाडांची कत्तल चालणार नाही. मी विकासाच्या विरोधात नाही, माझी मेट्रोला स्थगिती नाही, तर कारशेडला स्थगिती आहे. आपल्या हातातील वैभव गमावून आपण काही कमवत असू तर तो विकास होऊ शकत नाही. आरेमधलं पानही तोडलेले मला चालणार नाही,” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
“या सरकारने सर्वांशी नम्रपणे वागायला हवा, जो पैसा आपण खर्च करतो तो सर्वसामान्य करदात्यांचा आहे. त्यामुळे तो योजनांवर योग्य वापरला गेला नाही, तर तो पैसा उधळला असं होईल. मला जनतेच्या पैशाची उधळपट्टी करायची नाही. याची काळजी आम्ही घेणार आहोत, याबाबत मी सचिवांच्या बैठकीत सुचना दिल्या आहेत.” असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray varsha bungalow) म्हणाले.
“मी मुंबईत जन्मलेला पहिला मुख्यमंत्री असेन असे मला वाटतं. मी महाराष्ट्रासाठी करणारच, पण मुंबईसाठी सुद्धा बरेच काही करण्याचे डोक्यामध्ये विचार चालू आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांसाठी देखील उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.” असेही मुख्यमंत्री म्हणाले.
संबंधित बातम्या :
आरे कारशेडला स्थगिती, एक पानही तोडणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्रकारांकडून ‘या’ 6 अपेक्षा