‘या’ आवाहनाबद्दल उद्धव ठाकरेंनी नितीन गडकरींचे जाहीर आभार मानले!

राजकारण न करता सर्वांनी महाराष्ट्र सरकारच्या पाठीशी उभे राहावे, हे आवाहन केल्याबद्दल नितीन गडकरी यांचे लाख लाख धन्यवाद, असं उद्धव ठाकरे म्हणाले. (CM Uddhav Thackeray thanked Nitin Gadkari)

'या' आवाहनाबद्दल उद्धव ठाकरेंनी नितीन गडकरींचे जाहीर आभार मानले!
उद्धव ठाकरे आणि नितीन गडकरी
Follow us
| Updated on: Apr 26, 2020 | 2:35 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे जाहीर आभार व्यक्त केले. राजकारण न करता महाराष्ट्र सरकारच्या पाठीशी सर्वांनी उभे राहावे, सहकार्य करावे, हे आवाहन केल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी यांचे आभार मानले. (CM Uddhav Thackeray thanked Nitin Gadkari)

‘नितीन गडकरी यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. ‘कोरोना’च्या संकटकाळात जसे सर्व जण जातपात, धर्म बाजूला ठेऊन एकत्र येत आहेत. तसं राजकारण न करता सर्वांनी महाराष्ट्र सरकारच्या पाठीशी उभे राहावे, सहकार्य करावे, हे आवाहन केल्याबद्दल नितीन गडकरी यांचे लाख लाख धन्यवाद’, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये आज एकोपा आहे. एकोपा असूनही काही जण राजकारणातच गुंतले आहेत. मी याकडे लक्ष देत नाही, पण काही जण मला सांगतात, तुम्ही काम करताय, पण ते राजकारण करत बसले आहेत. ज्यांना राजकारण करायचंय, त्यांना करु देत, तो त्यांचा विषय आहे’, असंही उद्धव ठाकरे पुढे म्हणाले.

हेही वाचा : डॉक्टर, नर्स, आरोग्यसेवक, पोलीस यांच्या रुपाने देव आपल्याला मदत करत आहे : मुख्यमंत्री

ही राजकारणाची वेळ नाही, सर्वांनी एकत्र येऊन सरकारला सहकार्य करा, हा जो तुम्ही सल्ला दिला आहे, त्याबद्दल आभार. मी मुद्दाम हिंदीत बोललो, कारण थोडं ‘वरपर्यंत’ कळेल मी तुमची तारीफ केली. मी सगळं मोकळेपणाने बोलतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषद सदस्यत्वावरुन गेले काही दिवस राज्यात मोठं राजकारण रंगलं आहे. नितीन गडकरींनी राजकारण न करण्याचा सल्ला देत अप्रत्यक्षपणे राज्यातील भाजप नेत्यांचेच कान उपटले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी गडकरींचे आभार मानत विरोधकांनाच उत्तर दिल्याचं बोललं जातं.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

1. दिनदर्शिकाच सध्या दीन झाल्या आहेत, दिवस उगवत आहेत, मावळत आहेत 2. प्रार्थनास्थळे बंद, देव डॉक्टर-पोलिसांत आहे 3. लॉकडाऊन कधी संपणार असा अनेकांना प्रश्न आहे, लॉकडाऊनमुळे संकट गुणाकारातून वजाबाकीत 4. केंद्र व राज्यात एकोपा, तरी काहींचे राजकारण सुरुच, राजकारण दूर ठेवा म्हणणाऱ्या गडकरींना लाख लाख धन्यवाद (CM Uddhav Thackeray thanked Nitin Gadkari) 5. परराज्यातल्या मजुरांना हळूहळू घरी पाठवणार, मजुरांसाठी ट्रेन तर सुरु होणार नाहीत 6. पुन्हा गर्दी गोळा झाली तर तपश्चर्या वाया जाईल 7. लक्षणे दिसताच पुढे या, फिवर क्लिनिकला जा, अंगावर आजार काढला तर गंभीर परिस्थिती होईल 8. इतर डॉक्टरांनी त्यांचे क्लिनिक उघडावे 9. भविष्यात रुग्ण वाढले तर मोठी सोय करत आहोत 10. हॉटस्पॉट व कंटेनमेंट झोन घटत आहेत 11. महाराष्ट्रात आतापर्यंत 1,08,972 चाचण्या, राज्यात 1 लाख 1 हजार 62 रुग्ण निगेटिव्ह ठरले 12. आतापर्यंत 7 हजार 628 रुग्ण पॉझिटिव्ह ठरले, आतापर्यंत 323 रुग्णांचा दुर्दैवाने मृत्यु 13. रुग्णांशी संपर्क घडल्यानं रुग्ण वाढत आहेत 14. 70-80 % रुग्ण कसलीही लक्षणे नसलेले 15 उद्या पंतप्रधानांसोबत आमची बैठक 16. अमित शाहांचेही मला फोन येत आहेत 17. रोज लाखभर शिवभोजन थाळी देतोय 18. 5.5 ते 6 लाख मजुरांना 3 वेळचे जेवण देतोय

(CM Uddhav Thackeray thanked Nitin Gadkari)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.