Eknath Shinde : आरोप करणे विरोधकांचे कामच, जनहिताच्या निर्णयावर सरकारचे लक्ष, खातेवाटपावरुन मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना फटकराले
शिंदे सरकारची स्थापना झाल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणावरुन सरकारला कोंडीत पकडण्याची एकही संधी विरोधी पक्षाकडून सोडली जात नाही. यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होणार असा सवाल उपस्थित केला जात होता. त्यानंतर पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांना भरापई मिळणे गरजेचे असल्याचा मुद्दा विरोधकांनी लावून धरला.
सातारा : (Cabinet Expansion) मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आता खातेवाटपावरुन (Opposition) विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आहे. जेवढा विस्ताराला वेळ लागला तेवढाच वेळ आता खातेवाटपालाही जाणार शिवाय बिनखात्याचेच मंत्री हे यंदा 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करतील असाही टोला लगावण्यात आला होता.या सर्वावर (Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र, आरोप करणे हेच विरोधकांचे काम आहे. त्यामुळे त्यांना त्यांचे काम करु द्या सरकार मात्र, जनहिताचे निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे. मात्र, खातेवाटप कधी या प्रश्नाला त्यांनी बगल दिली असून नेमके खातेवाटप होणार तरी कधी हा प्रश्न कायम आहे.
विरोधकांकडून टीका
शिंदे सरकारची स्थापना झाल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणावरुन सरकारला कोंडीत पकडण्याची एकही संधी विरोधी पक्षाकडून सोडली जात नाही. यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होणार असा सवाल उपस्थित केला जात होता. त्यानंतर पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांना भरापई मिळणे गरजेचे असल्याचा मुद्दा विरोधकांनी लावून धरला. आता विस्तार आणि शेतकऱ्यांच्या मदतीचे स्वरुप स्पष्ट केले असतानाच मंत्रिमंडळाचा विस्तार झाला खातेवाटपाचे काय असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे शिंदे सरकार हे वाटप केव्हा करणार हे पहावे लागणार आहे.
महिन्याभरात जनहिताचे निर्णय
विरोधकांकडून आरोप हे होणारच. महत्वाचे निर्णय सरकारने घेतले असून प्रत्येक निर्णय हा स्टेप-बाय स्टेप हा घेतला जाणारच आहे. केवळ मुद्दा उपस्थित करुन राजकारण करणे हे काही योग्य नाही. गेल्या महिन्याभरात जनतेच्या हिताचे मोठे निर्णय झाले आहेत. त्याबद्दल कोणी बोलत नसले तरी जनतेला ते माहिती आहे. त्यामुळे विरोधकांनी त्यांचे काम करु द्या सरकार आपल्या कामात व्यस्थ असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे.
बिनखात्याचे मंत्री ध्वजारोहण करणार
खातेवाटपावरुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही शिंदे सरकारला खोचक टोला लगावला आहे. शिंदे सरकारच्या काळात काही ऐतिहासिक बाबी होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता बिनखात्याचे मंत्री हे यंदा ध्वजारोहण करतील. शिवाय मुख्यमंत्री हे गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असते तर चित्र वेगळे असते असेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे.