चौकशीसाठी हजर व्हा, अन्यथा फरार घोषित करू, सोमय्यांना आर्थिक गुन्हेशाखेची नोटीस
भाजपचे (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या अडचणीमध्ये वाढ होताना दिसत आहे, 'विक्रांत बचाव'च्या नावाखाली कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर महाविकास आघाडीमधील (Mahavikas Aghadi) नेत्यांकडून करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून किरीट सोमय्या बेपत्ता आहेत. आता त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
भाजपचे (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या अडचणीमध्ये वाढ होताना दिसत आहे, ‘विक्रांत बचाव’च्या नावाखाली कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर महाविकास आघाडीमधील (Mahavikas Aghadi) नेत्यांकडून करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून किरीट सोमय्या बेपत्ता आहेत. दरम्यान या प्रकरणात आता आर्थिक गुन्हेशाखेच्या पथकाने सोमय्या यांच्या घरावर धडक देऊन, त्यांना आज सकाळी आकरापर्यंत चौकशीस हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. त्यांच्या राहत्या घराच्या दरवाजावर ही नोटीस चिकटवण्यात आली आहे. अडचणीत वाढ म्हणजे मंगळवारीच त्यांचा मुलगा नील सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्जही सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. दरम्यान यापूर्वी देखील सोमय्या पितापुत्रांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स दिले होते. पण ते हजर झाले नाहीत. दुसऱ्या नोटिसीनंतरही ते चौकशीसाठी हजर झाले नाहीत तर त्यांना फरार घोषित केले जाईल अशी माहित पोलिसांनी दिली आहे.
…तर फरार घोषित करू
‘विक्रांत बचाव’च्या नावाखाली कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांच्यांवर आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून सोमय्या हे बेपत्ता आहेत. दरम्यान आर्थिक गुन्हेशाखेच्या पथकाने काल सोमय्या यांच्या घरी जाऊन त्यांच्या राहत्या घराच्या दरवाजावर नोटीस चिटकवली आहे. या नोटीसीमध्ये आज सकाळी अकरापर्यंत त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी देखील सोमय्या पितापुत्रांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स दिले होते. पण ते हजर झाले नाहीत. दुसऱ्या नोटिसीनंतरही ते चौकशीसाठी हजर झाले नाहीत तर त्यांना फरार घोषित केले जाईल, असं पोलिसांनी म्हटले आहे.
भाजपला सहआरोपी करा – पटोले
दरम्यान या सर्व प्रकरणावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या प्रकरणात भाजपला सहआरोपी करा अशी मागणी केली आहे. ते याबाबत बोलताना म्हणाले की, ‘सोमय्यांनी ‘विक्रांत बचाव’ मोहिमेतील निधी पक्षाला दिल्याचे सांगितले ही जर गोष्ट खरी असेल तर तो देखील गुन्हा ठरतो, त्यामुळे या प्रकरणात भाजपाला देखील सहआरोपी केले गेले पाहिजे.’ या प्रकरणात तत्कालील प्रदेशाध्यक्ष आणि खजीनदारांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी पटोले यांनी केली आहे.
संबंधित बातम्या
Raj Thackeray | राज ठाकरेंना फार महत्त्व देऊ नका, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया