दिल्लीत नाही, किमान हरियाणात तरी सोबत घ्या, केजरीवालांचं काँग्रेससमोर पुन्हा लोटांगण

नवी दिल्ली : काँग्रेसने वारंवार नकार दिल्यानंतरही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल काँग्रेसशी युती करण्यासाठी आतूर झालेत. काँग्रेसने दिल्लीत युतीचा प्रस्ताव फेटाळलाय. पण हरियाणात काँग्रेसने युतीवर विचार करावा, असं आवाहन आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केलंय. युती झाल्यास दहा पैकी दहा जागांवर भाजपचा पराभव होईल, असंही ते म्हणाले. अमित शाह आणि नरेंद्र मोदी […]

दिल्लीत नाही, किमान हरियाणात तरी सोबत घ्या, केजरीवालांचं काँग्रेससमोर पुन्हा लोटांगण
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

नवी दिल्ली : काँग्रेसने वारंवार नकार दिल्यानंतरही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल काँग्रेसशी युती करण्यासाठी आतूर झालेत. काँग्रेसने दिल्लीत युतीचा प्रस्ताव फेटाळलाय. पण हरियाणात काँग्रेसने युतीवर विचार करावा, असं आवाहन आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केलंय. युती झाल्यास दहा पैकी दहा जागांवर भाजपचा पराभव होईल, असंही ते म्हणाले.

अमित शाह आणि नरेंद्र मोदी या जोडीला हरवण्याची देशातील जनतेची इच्छा आहे. हरियाणामध्ये जेजेपी, आप आणि काँग्रेसने एकत्र निवडणूक लढल्यास हरियाणातील दहापैकी दहा जागांवर भाजपचा पराभव होईल. राहुल गांधींनी यावर विचार करावा, असं ट्वीट केजरीवालांनी केलं. जेजेपी हा दुष्यंत चौटाला यांचा पक्ष आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत हरियाणात भाजपने सात, काँग्रेसने एक आणि आयएनएलडीने दोन जागांवर विजय मिळवला होता. आयएनएलडीमधून फूट पडून जेजेपी या पक्षाची स्थापना करण्यात आली.

राजधानी दिल्लीतील सात जागांसाठीही अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसला एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं. पण काँग्रेसने या ऑफरला स्पष्ट शब्दात नकार दिला. काँग्रेसच्या दिल्ली अध्यक्ष शीला दीक्षित यांचा सल्ला घेतल्यानंतर केजरीवालांनी दिल्लीतील सर्वच्या सर्व सात जागांवर उमेदवार देण्याचा निर्णय घेतला.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सर्वच्या सर्व जागा भाजपने जिंकल्या होत्या. काही सर्व्हेंनुसार, यावेळीही दिल्लीत काँग्रेस आणि आपचं खातं न उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळेच केजरीवाल काँग्रेसला गळ घालत आहेत. काँग्रेस आणि आप दिल्लीत एकत्र आल्यास भाजपच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होईल. पण काँग्रेसच्या मनात काय चाललंय हे समजत नसल्याचं केजरीवाल म्हणाले होते.

व्हिडीओ पाहा

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.