‘हिंदूची बाजू घेतली, दाऊदला महाराष्ट्र भूषण द्या’-नितेश राणे
आम्ही हिंदूची बाजू घेतली आहे, तसेच चुकीचं काही बोलेलो नाही. त्यामुळे आम्हाला काही अडचण नाही, सकाळी आमच्या विरोधात तक्रार झाल्याचे समजले आहे
मुंबई – आम्ही हिंदूची बाजू घेतली आहे, तसेच चुकीचं काही बोलेलो नाही. त्यामुळे आम्हाला काही अडचण नाही, सकाळी आमच्या विरोधात तक्रार झाल्याचे समजले आहे. योग्यवेळ आल्यावर त्यावर बोलेन असं नितेश राणे (nitesh rane) यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. तसेच महाविकास आघाडीसरकारला दाऊदचा इतका पुळका आहे तर त्यांनी दाऊदला महाराष्ट्र भूषण देऊन टाका. त्याचबरोबर आम्ही काहीही चुकीचं बोललेलो नाही अनिल देशमुख (anil deshmukh) हिंदु असल्याने त्यांचा राजीनामा घेतला मग नवाब मलिक (nawab malik) मुस्लिम असल्याने त्याचा राजीनामा घेतला नाही का ? असा सवाल आम्ही उपस्थित केला. आम्ही हिंदू मुस्लीमांमध्ये तेढ निर्माण होईल असं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही, तसेच दोन्ही समाजात तेढ निर्माण व्हावं अशी आमची इच्छा देखील नाही.योग्य वेळी आम्ही योग्य उत्तर देऊ असं नितेश राणेंनी सांगितलं
काय आहे प्रकरण ?
अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला ते हिंदू असल्यामुळे तर नवाब मलिकांचा राजीनामा हे मुस्लिम असल्यामुळे घेऊ शकत नाही असं वक्तव्य राणे बंधुकडून करण्यात आलं होतं. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते सुरज चव्हाण यांच्याकडून मरीन ड्राईव्ह पोलिस स्टेशनमध्ये राणे बंधुच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीत राणे बंधुकडून जाणीपूर्वक समाजामध्ये हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करून दंगली घडतील असे भाष्य केलं जात आहे, तसेच राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव दाऊद इब्राहिमशी जोडून त्यांच्या जीवितास धोका निर्माण केला असल्याच म्हटलं आहे. त्यामुळे आता नितेश राणे पोलिसांना काय जबाब देणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक
नवाब मलिकांना ईडीने ताब्यात घेतल्यापासून महाविकास आघाडी भाजप सरकार एकमेकांविरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. तेव्हापासून भाजपाचे आमदार नितेश राणे महाविकास आघाडीच्या प्रत्येक नेत्यावरती टीका करीत आहेत. कोकणात एका शिवसैनिकाला मारहाण केल्याच्या प्रकरणात त्यांना पोलिसांनी अटक देखील केली होती. सध्याच्या प्रकरणात पोलिस नितेश राणेंच्या विरोधात आता कोणती भूमिका घेणार हे काही दिवसात स्पष्ट होईल. राष्ट्रवादीचे नेते सुरज चव्हाण यांनी तक्रार देताना पुरावा म्हणून एक पुराव्याचा पेनड्राईव्ह सुध्दा पोलिसांना दिला आहे.