सरकारची बदनामी केल्याचा आरोप करत भाजपची जयंत पाटलांविरोधात तक्रार
मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीने टीव्हीवर जाहिरात दाखवत सरकारची बदनामी केल्याचा आणि जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप भाजपच्या आमदार मनीषा चौधरी यांनी केला आहे. याबाबत आमदार चौधरी, प्रवीण दरेकर आणि भाजपचे मुंबई जिल्हा अध्यक्ष विनोद शेलार यांनी दहिसर पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांविरोधात तक्रार दाखल केली. तसेच या प्रचारावर तत्काळ बंदी आणावी, अशीही […]
मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीने टीव्हीवर जाहिरात दाखवत सरकारची बदनामी केल्याचा आणि जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप भाजपच्या आमदार मनीषा चौधरी यांनी केला आहे. याबाबत आमदार चौधरी, प्रवीण दरेकर आणि भाजपचे मुंबई जिल्हा अध्यक्ष विनोद शेलार यांनी दहिसर पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांविरोधात तक्रार दाखल केली. तसेच या प्रचारावर तत्काळ बंदी आणावी, अशीही मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्याची माहिती भाजपने दिली आहे.
भाजपने सांगितले, ‘भाजपने शेतकरी सन्मान योजनेसह अन्य योजनांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बळ देण्याचे काम केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते भाजपमध्ये आले. आता त्यांच्याकडे विकास आणि भ्रष्टाचाराचाही मुद्दा शिल्लक नाही. त्यामुळेच काँग्रेस-राष्ट्रवादी भाजपला बदनाम करत टीव्हीवर जाहिराती दाखवत आहेत.’
आम्ही जनतेला रोख पैसे दिले नाही, तर त्यांच्या हक्काचे पैसे थेट बँक खात्यात हस्तांतरित केले. त्यानंतरही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षांच्या फोटोसह बदनामीकारक जाहिरात दाखवली जात आहे. त्याविरोधात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी 16 एप्रिलला निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. आज आम्हीही टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या जाहिरातींविरोधात दहिसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली, अशी माहिती भाजपने दिली.