ठाणे : कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती आणि माजी भाजप नगरसेवक संदीप गायकर यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार करण्यात आली आहे. कल्याणमधीलच एका समाजसेविका महिलेनं ही तक्रार केली आहे. या प्रकरणी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी एखाद्याने चूक केली असेल तर त्याच्या विरोधात कायद्याप्रमाणे योग्य ती चौकशी झाली पाहिजे, असं सष्ट मत व्यक्त केलं आहे. (Complaint of molestation against BJP corporator in Kalyan)
भाजप नगरसेवक संदीप गायकर यांच्या विरोधात सोशल मीडियाच्या माध्यमातून संबंधित महिलेला अश्लील मेसेज पाठवले, तसंच धमकी दिल्याचा आरोप लावण्यात आला आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली आहे. याबाबत किरीट सोमय्या यांना पत्रकारांकडून प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी कुणी काही चूक केली असेल तर त्याच्या विरोधात कायद्यानुसार चौकशी आणि कारवाई झाली पाहिजे, असं सोमय्या म्हणाले.
किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर आरोपांची मालिकाच सुरु केली आहे. अशावेळी शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी सोमय्या यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. परब यांनी किरीट सोमय्यांविरोधात 100 कोटीचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. सोमय्या यांना त्यांनी 72 तासांत उत्तर देण्यास सांगितलं आहे. तर अनिल परब यांच्या दाव्याला आपण भीक घालत नसल्याचं उत्तर सोमय्या यांनी दिलं आहे.
अनिल परब यांच्या दाव्याला आपण भीक घालत नाही. आता शिवसेनेला असं वाटणार नाही की फक्त आमचेच घोटाळे बाहेर काढतात. आता विदर्भातील काँग्रेसचे मंत्री टार्गेटवर असल्याचा इशाराच सोमय्या यांनी आज दिलाय. कोट्यवधी रुपयांचे घोटाळे बाहेर येणार आहे. एनसीपी परिवारातील एक मोठा घोटाळा बाहेर येणार आहे, असं सोमय्या म्हणाले. दरम्यान, विदर्भातील काँग्रेस मंत्र्यांपैकी सोमय्या यांचा रोख कुणाकडे आहे? असा सवाल आता विचारला जातोय. विदर्भात काँग्रेसचे सुनिल केदार, विजय वडेट्टीवार आणि यशोमती ठाकूर या मंत्री आहेत. तर राष्ट्रवादी परिवारातील आता कोणता मंत्री सोमय्यांच्या रडारवर आहे, हे पाहणही महत्वाचं ठरणार आहे.
अनिल परब यांनी मंगळवारी सोमय्यांविरोधात 100 कोटींच्या अबुनुकसानीचा दावा ठोकला आहे. परब यांचे वकील सुषमा सिंग यांनी सोमय्यांना एक नोटीस पावली आहे. त्यानुसार आता सोमय्या यांना 72 तासात उत्तर देण्यास सांगतिलं आहे. सोमय्या यांनी परब यांच्यावर कोकणात दापोली येथे बेकायदा हॉटेल बांधल्याचा आरोप केला होता. तसंच परिवहन विभागात बदल्याचे रॅकेट परब यांनी चालवल्याचा जाहीर आरोपही सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर परब यांनी आता आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
इतर बातम्या :
किरीट सोमय्यांकडे ईडीचं प्रवक्तेपद द्या; रोहित पवारांचा जोरदार टोला
अनिल परबांकडून सोमय्यांविरुद्ध 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा, मुश्रीफही पवारांच्या भेटीला
Complaint of molestation against BJP corporator in Kalyan