Sanjay Raut : आमदारांची नावं जाहीर केल्यानं संजय राऊत अडचणीत, निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल होणार?
संजय राऊत यांनी राज्यसभेच्या निवडणुकीच्या आगोदरपासून निवडणुकीत घोडेबाजार होण्याची होण्याची शक्यता व्यक्त केली होती. निवडणूक झाल्यानंतर सुध्दा त्यांनी घोडेबाजार झाल्याचं सांगितलं.
मुंबई : राज्यसभेच्या (Rajya Sabha Election) निवडणुकीचं दिवसभर देशाने राजकीय नाट्य पाहिलं. त्यामध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत आम्हीचं जिंकणार असा दावा दोन्ही पक्षांकडून केला जात होता. त्यानंतर राज्यकीय नाट्याला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली. महाविकास आघाडीच्या (MVA) आमदारांनी चुकीच्या पद्धतीने मतदान केल्याचा आरोप भाजपकडून (BJP) करण्यात आला. त्यानंतर भाजपच्या आमदारांनी चुकीच्या पद्धतीने मतदान केल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला. हे प्रकरण केंद्रीय निवडणुक आयोगाकडे गेले. त्यानंतर मतमोजणीला आठ तासांचा विलंब झाला. मध्यरात्री निकाल जाहीर झाला. अपक्ष आमदारांनी आणि बहुजन विकास आघाडीच्या आमदारांनी भाजपला मतदान केल्याने भाजपच्या सीट निवडून आल्याचं संजय राऊत यांनी मीडियाला सांगितले. तसेच अनेक आमदारांची नावं देखील जाहीरपणे सांगितली. त्यामुळेआमदारांचा अपमान झाला आहे. त्याचबरोबर अचारसंहितेचा भंग झाला असल्याचा दावा प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
संजय राऊत यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे
संजय राऊत यांनी राज्यसभेच्या निवडणुकीच्या आगोदरपासून निवडणुकीत घोडेबाजार होण्याची होण्याची शक्यता व्यक्त केली होती. निवडणूक झाल्यानंतर सुध्दा त्यांनी घोडेबाजार झाल्याचं सांगितलं. त्यामुळे आचार संहितेचा भंग झाला आहे. त्याचबरोबर आमदारांचा त्यांनी अपमान देखील केला आहे. संजय राऊत यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे असं देखील प्रवीण दरेकर यांनी सांगितलं. ते सध्या दौऱ्यावर आहेत.
पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते भाजपच्या नेत्यावरती नाराज
पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते भाजपच्या नेत्यावरती नाराज आहेत. पंकजा मुंडे यांना वारंवार टाळलं जात असल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. काल बीडमधून प्रवीण दरेकर यांच्या गाड्यांचा ताफा निघाला होता. ही माहिती पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांना लागली. त्यांनी गाड्यांचा ताफा अडवला. त्यावेळी प्रवीण दरेकर यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु कार्यकर्ते ऐकत नसल्याने त्यांना पोलिसांना पाचारण करावे लागले. त्यानंतर गाड्यांचा ताफा पुढे सरकला.
कोणत्या उमेदवाराला किती मतं मिळाली
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाराष्ट्रातील सत्ताधारी आघाडीला मोठा धक्का बसला, भाजपने राज्यसभेच्या सहापैकी तीन जागा जिंकल्या आहेत, तर सत्ताधारी युतीने मतमोजणीला आठ तास उशीर झाल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भाजपच्या विजयी उमेदवारांमध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयल, माजी राज्यमंत्री अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांचा समावेश आहे. शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगढ़ी यांनीही चुरशीच्या निवडणुकीत विजय मिळवला.
284 वैध मतांपैकी गोयल यांना 48, बोंडे 48, महाडिक 41.56, राऊत 41, प्रतापगढी 44 आणि पटेल यांना 43 मते मिळाली.