सोलापुरात आघाडीत राडा, प्रणिती शिंदेंविरोधात राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार रिंगणात

सोलापूरमध्ये काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde vs NCP) यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

सोलापुरात आघाडीत राडा, प्रणिती शिंदेंविरोधात राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार रिंगणात
Follow us
| Updated on: Oct 04, 2019 | 4:03 PM

सोलापूर :  काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली असली तरी, काही मतदारसंघात दोन्ही पक्षात टोकाचा विरोध आहे. त्याचीच प्रचिती सोलापुरात येत आहे. सोलापूरमध्ये काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde vs NCP) यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  सोलापूर शहर मध्य मतदारसंघात (Praniti Shinde vs NCP) पक्षाच्या आदेशानुसार जुबेर बागवान यांनी अर्ज दाखल केला.

पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात काँग्रेसने अर्ज दाखल केल्याने राष्ट्रवादीने ही खेळी केल्याचं सांगण्यात येत आहे. जुबेर बागवान हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष असून मुस्लिम चेहरा म्हणून रिंगणात उतरवले आहे.

भारत भालके काँग्रेसमधून राष्ट्रवादीत

पंढरपूरचे काँग्रेस आमदार भारत भालके भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोर धरत होत्या. मात्र अचानक भारत भालकेंनी ‘डब्ल्यू’ टर्न घेत तिसऱ्याच पक्षाची (Congress MLA Bharat Bhalke in NCP) वाट धरली . कमळ हाती घेता-घेता भारत भालकेंनी अचानक राष्ट्रवादीचं ‘घड्याळ’ हाती बांधलं. भारत भालके राष्ट्रवादीत आल्याने पक्षांने त्यांना तिकीट दिलं. मात्र मूळची ही जागा काँग्रेसच्या वाट्याला होती. त्यामुळे काँग्रेसने इथे शिवाजीराव कलुंगे यांना उमेदवारी दिली.

विद्यमान आमदाराला तिकीट या न्यायाने काँग्रेसने ही जागा सोडायला हवी, अशी राष्ट्रवादीची धारणा. मात्र जागावाटपात ही जागा काँग्रेसची असल्याने राष्ट्रवादीने घुसखोरी केल्याचा काँग्रेसचा आरोप आहे.

या सर्व राड्याचा परिणाम सोलापूर शहर मध्य मतदारसंघात दिसत आहे. या मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराविरोधात राष्ट्रवादीनेही उमेदवार दिल्याने आघाडीत मोठा पेच निर्माण झाला आहे.

संबंधित बातम्या 

काँग्रेस आमदार भारत भालकेंचं ‘जाना था भाजप, पहुँच गये राष्ट्रवादी’  

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.