प्रचारसभा राष्ट्रवादीची, शिवसेनेला मत देण्याचं आवाहन
रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. सर्वच पक्षांनी प्रचार सभांचा सपाटा लावला आहे. सध्या सगळीकडे सभा, रॅली, बैठका याचंच चित्र आहे. या सभांमध्ये कोण काय बोलून जाईल याचा काहीही नेम नसतो. असाच काहीसा गमतीदार किस्सा राष्ट्रवादीच्या जाहीर सभेत घडला. रत्नागिरी येथे काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांनी जाहीर सभेत भाषण करत असताना चुकून आपल्या उमेदवाराला सोडून चक्क […]
रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. सर्वच पक्षांनी प्रचार सभांचा सपाटा लावला आहे. सध्या सगळीकडे सभा, रॅली, बैठका याचंच चित्र आहे. या सभांमध्ये कोण काय बोलून जाईल याचा काहीही नेम नसतो. असाच काहीसा गमतीदार किस्सा राष्ट्रवादीच्या जाहीर सभेत घडला. रत्नागिरी येथे काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांनी जाहीर सभेत भाषण करत असताना चुकून आपल्या उमेदवाराला सोडून चक्क शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन केलं. सोशल मिडियावर सध्या तालुकाध्यक्षांचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
रायगड मतदारसंघातील खेड तालुक्यातील दस्तुरी गावात राष्ट्रवादीची जाहीर सभा घेण्यात आली. राष्ट्रवादीचे उमेदवार सुनिल तटकरे यांच्या प्रचारासाठी हा सभा घेण्यात आली होती. या सभेत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गौस खतिब हेही उपस्थित होते. गौस खतिब हे मनसेपासून ते शिवसेनेपर्यंत सर्वच पक्षांशी सोयरीक जुळवलेले नेते आहेत. सुनिल तटकरे यांच्या प्रचार सभेत गौस खतिब यांनी दहा मिनिटं भाषण केलं. त्यानंतर भाषणाच्या शेवटी सुनिल टतकरे यांना मत द्या, असं म्हणण्याऐवजी खतिब यांनी शिवसेनेला मत द्या असं आवाहन केलं. त्यानंतर सभेत एकच हशा पिकला. चूक लक्षात येताच तालुकाध्यक्षांनी ती सुधारली आणि सुनिल टतकरे यांना मत देण्याचं आवाहन केलं.
रायगड मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार सुनिल तटकरे यांच्या विरुद्ध शिवसेनेचे अनंत गीते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसेच वंचित बहुजन आघाडीकडून सुमन कोळी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला आहे. त्यासाठी आघाडी, शिवसेना-भाजप युतीच्या अनेक छोट्या-मोठ्या सभा गल्ली बोळात होत आहेत. जिकडे-तिकडे सभांचांचा उत आलेला दिसतो आहे. कधी सेनेच्या उमेदवारासाठी, कधी राष्ट्रवादीच्या, कधी भाजपच्या, तर कधी काँग्रेसच्या उमेदवारासाठी सभा होत आहेत. पण, सध्या या सभांमध्ये अनेक पक्षांशी सोयरीक जुळवणारे तोंडावर कसे पडतात, हे या तालुकाध्यक्षांवरुन लक्षात येतं.