भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी काँग्रेसच्या 99 टक्के आमदारांचा शिवसेनेला पाठिंबा?

महाराष्ट्रातील नेते हायकमांड समोर शिवसेनेला पाठिंबा देत सत्तेत जाण्याचा आग्रह धरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली (congress mla support shivsena) आहे.

भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी काँग्रेसच्या 99 टक्के आमदारांचा शिवसेनेला पाठिंबा?
Follow us
| Updated on: Nov 06, 2019 | 11:58 PM

नवी दिल्ली : राज्यात भाजप -शिवसेनेत सध्या सत्तासंघर्ष सुरु आहे. त्यातच काँग्रेसचे दिग्गज नेते उद्या दिल्लीत जाऊन हायकमांडची भेट घेणार आहे. यावेळी महाराष्ट्रातील नेते हायकमांडसमोर शिवसेनेला पाठिंबा देत सत्तेत जाण्याचा आग्रह धरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली (congress mla support shivsena) आहे. विशेष म्हणजे भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी 99 टक्के काँग्रेस आमदारांची तयारी असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील काँग्रेस नेत्यांची आज बैठक पार पडली. या बैठकीत सत्तासंघर्षाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीनंतर राज्यातील दिग्गज नेते उद्या दिल्लीत जाऊन हायकमांडची भेट घेणार आहेत. या भेटीमध्ये आजच्या बैठकीतील चर्चा हायकमांडला दिली जाणार आहे.

तसेच शिवसेनेला पाठिंबा देऊन सत्तेत जाण्याचा आग्रहही महाराष्ट्रातील काँग्रेस नेते हायकमांड समोर करणार आहे. विशेष म्हणजे भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी 99 टक्के आमदारांची तयारी असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागलं (congress mla support shivsena) आहे.

तर दुसरीकडे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्या सर्व शिवसेना आमदारांची बैठक बोलवली आहे. यावेळी भाजपसोबत सत्ता स्थापन करायची का याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे. तसेच उद्या भाजपचे नेते राज्यपालांना भेटणार आहे. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी उद्याचा दिवस महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

सत्तास्थापनेचा तिढा अद्याप कायम 

राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून 14 दिवस उलटले. मात्र, सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही कायम आहे. बहुमत मिळवूनही भाजप-शिवसेना युतीने सत्ता स्थापन केलेली नाही. दोन्ही पक्षांमध्ये 50-50 च्या फॉर्म्युल्यावरुन खडाजंगी पाहायला मिळत आहे. 9 नोव्हेंबरपर्यंत सत्ता स्थापन करणं आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

शरद पवारांनी आपण विरोधात बसणार असल्याचं म्हटलं असलं, तरी त्यांच्या दिल्ली भेटीने अनेक पर्यायांची चाचपणी सुरु असल्याचं दिसतं.

राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दर्शवण्यासाठी अनुकूलता दर्शवली आहे. मात्र सेनेला थेट पाठिंबा देणं काँग्रेससाठी अडचणीचं (Congress Conditionally Supports Shivsena) आहे. शिवसेनेला थेट पाठिंबा दर्शवला तर अन्य राज्यात त्याचा परिणाम होऊ शकतो.

संबंधित बातम्या : 

प्रसाद लाड धनंजय मुंडेंच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुनगंटीवारांकडूनच शिवसेनेचा मुख्यमंत्री होतोय ही गोड बातमी मिळेल : संजय राऊत

24 तारखेपासून आम्ही सांगतोय, पण तुम्ही लोकं समजूनच घेत नाही : अजित पवार

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....