शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन जळगावात आज काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने! जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन

भाजपकडून शेतकऱ्यांच्या विमा प्रश्नावरुन राज्य सरकारविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. तर काँग्रेसकडून केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. भाजपकडून सकाळी 11 वाजता हे आंदोलन करण्यात येणार आहे. तर काँग्रेसचं दुपारी 2 वाजता आंदोलन आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन जळगावात आज काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने! जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन
Follow us
| Updated on: Nov 09, 2020 | 9:40 AM

जळगाव: एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर खडसेंनी जळगाव भाजपला खिंडार पाडण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. अशा स्थितीत आज जळगावात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने येत आहेत. महत्वाची बाब म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हे दोन्ही पक्ष आज जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करणार आहेत. (Congress and BJP agitation on the same day in Jalgaon today)

भाजपकडून शेतकऱ्यांच्या विमा प्रश्नावरुन राज्य सरकारविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. तर काँग्रेसकडून केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. भाजपकडून सकाळी 11 वाजता हे आंदोलन करण्यात येणार आहे. तर काँग्रेस दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर रॅली काढणार आहे. त्यामुळे जळगावात आज एकाच दिवशी भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन रस्त्यावर उतरलेले आपल्याला पाहायला मिळणार आहे. महत्वाची बाब म्हणजे भाजप केंद्रात सत्तेवर आहे. तर काँग्रेस राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा सत्तेतील सहकाही पक्ष आहे.

जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमिंग सुरुच

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील अनेक भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. 8 दिवसांपूर्वी रावेर तालुक्यातील 60 भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या मुक्ताईनगर येथील निवासस्थानी एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची इनकमिंग सुरु झाल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, भाजप नेते गिरीश महाजन यांना भाजप कार्यकर्त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत प्रश्न विचारला असता कोणत्याही नगरसेवकाने, जिल्हा परिषद सदस्याने राजीनामा दिलेला नसल्याचं स्पष्ट केलं

“राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे यांना काय मिळत हा खडसे आणि राष्ट्रवादीचा प्रश्न आहे. एकनाथ खडसे यांनी आमचा पक्ष सोडला आहे आणि आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पक्ष सोडून कुणी जाणार नाही, जे हौशे गवशे आहेत तेच जातील”, असा टोला गिरीश महाजनांनी लगावला.

संबंधित बातम्या:

जळगावमध्ये भाजपच्या बैठकीनंतर कार्यकर्त्याची गिरीश महाजनांना शिवीगाळ, गाडीवर दगडही भिरकावला

सतेज पाटलांच्या हाती स्टिअरिंग, कोल्हापुरात काँग्रेसची ट्रॅक्टर रॅली, थोरात, पृथ्वीराज चव्हाणांची हजेरी

अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण सुटल्याने मोदींची शेतकऱ्यांवर वक्रदृष्टी; पृथ्वीराज चव्हाणांची टीका

Congress and BJP agitation on the same day in Jalgaon today

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.