राज्यात सर्वाधिक नुकसान शिवसेनेचं, रोहित पवारांचा युतीसाठी ‘एक्झिट पोल’
पुणे : लोकसभा निवडणुकीत आघाडीला तब्बल 21 जागा मिळतील, तर राष्ट्रवादीचा 14 जागांवर विजय होणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी केलाय. देशात एनडीएला 230 आणि यूपीएला 150 जागा मिळणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. या निवडणुकीत शिवसेनेला मोठा फटका बसणार असून भाजपने त्यांचं काम केलं नसल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय. बारामती […]
पुणे : लोकसभा निवडणुकीत आघाडीला तब्बल 21 जागा मिळतील, तर राष्ट्रवादीचा 14 जागांवर विजय होणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी केलाय. देशात एनडीएला 230 आणि यूपीएला 150 जागा मिळणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. या निवडणुकीत शिवसेनेला मोठा फटका बसणार असून भाजपने त्यांचं काम केलं नसल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय.
बारामती आणि मावळमध्ये आमचाच विजय होणार असल्याचं रोहित पवारांनी निक्षून सांगितलंय. भाजपने बारामतीत जास्त लक्ष दिल्याने राज्यात आम्हाला फायदा होईल. मात्र ईव्हीएमची भीती आहेच. इलेक्ट्रॉनिक मशीन असल्याने काहीही होऊ शकतं, असं म्हणत अजित दादांच्या विधानाला वेगळी पार्श्वभूमी असल्याचा त्यांनी खुलासा केलाय. ईव्हीएम हॅकिंग होऊ शकत नाही, असं काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी म्हटलं होतं.
या निकालाविषयी एनडीएलाही धाकधूक आहे. त्यामुळेच भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना तब्बल आठ वेळा फोन केलाय. पूर्वी ते भाव देत नव्हते. त्यामुळे पाणी कुठं तरी मुरत असल्याचा संशय रोहित पवारांनी व्यक्त केला.
शरद पवार यांच्यात यूपीए आणि एनडीएच्या घटक पक्षांना फिरवण्याची ताकद आहे. त्यामुळे आघाडीचं सरकार येऊ शकतं, असा दावा रोहित पवारांनी केला. पवार साहेब पंतप्रधान व्हावेत हे कार्यकर्त्यांचं स्वप्न असल्याचं त्यांनी म्हटलंय. राष्ट्रवादीच्या गळतीवर बोलताना धान्यातील खडे निघून जात आहेत. पाणी शुद्ध होण्यासाठी गाळ निघणं गरजेचं आहे. काही वैयक्तिक मतभेद असतील. त्यामुळे आम्ही लक्ष देत नसल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय.
संबंधित बातम्या :