औरंगाबादेत काँग्रेसचा उमेदवार, राष्ट्रवादीच्या सतिश चव्हाणांची जाहीर नाराजी
औरंगाबाद: काँग्रेसच्या उमेदवरीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे इच्छुक उमेदवार सतिश चव्हाण यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसने तिसऱ्या यादीत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून सुभाष झांबड यांना उमेदवारी दिली आहे. या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही होती. राष्ट्रवादीकडून सतिश चव्हाण हे उमेदवारीसाठी प्रयत्न करत होते, मात्र काँग्रेसने ही जागा सोडण्यास नकार दिला. यानंतर औरंगाबादमध्ये काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीचे […]
औरंगाबाद: काँग्रेसच्या उमेदवरीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे इच्छुक उमेदवार सतिश चव्हाण यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसने तिसऱ्या यादीत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून सुभाष झांबड यांना उमेदवारी दिली आहे. या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही होती. राष्ट्रवादीकडून सतिश चव्हाण हे उमेदवारीसाठी प्रयत्न करत होते, मात्र काँग्रेसने ही जागा सोडण्यास नकार दिला.
यानंतर औरंगाबादमध्ये काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीचे सतिश चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. सतिश चव्हाण यांनी फेसबुकवर त्याबाबत पोस्ट लिहिली आहे.
“औरंगाबादेत 1999 पासून काँग्रेस पराभूत होत आहे, तरीही काँग्रेसला आत्मपरीक्षणाची गरज वाटत नाही. मी निवडून येऊ शकत होतो. मात्र, काँग्रेसला जागा दिली, पूर्ण तयारी अभावी पराभव होतो, काहींवर अंगारा धुपऱ्याचा परिणाम होतो”, असं सतिश चव्हाण यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
सतिश चव्हाण यांची फेसबुक पोस्ट
अब्दुल सत्तारही नाराज?
दरम्यान, सुभाष झांबड यांच्या उमेदवरीबाबत विश्वासात घेतलं नसल्याचा दावा, काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी केला आहे. आमदार अब्दुल सत्तार हे औरंगाबाद काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. काँग्रेसचे औरंगाबादचे उमेदवार सुभाष झांबड आणि आमदार अब्दुल सत्तार यांच्यात वाद सुरू होता. झांबड यांना तिकीट जाहीर झाल्यानंतर आपल्याला विश्वासात घेतले नसल्याचा दावा सत्तार यांनी केला आहे.
औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरे विरुद्ध सुभाष झांबड
दरम्यान, औरंगाबादमध्ये आता शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे विरुद्ध काँग्रेसचे सुभाष झांबड यांच्यात लढत होणार आहे. यंदाही चंद्रकांत खैरे विजय मिळवणार की सुभाष झांबड बाजी मारतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील आमदार कुणाचे आहेत?
- औरंगाबाद पूर्व – अतुल सावे – भाजप
- औरंगाबाद मध्य – इम्तियाज जलील – एमआयएम
- औरंगाबाद पश्चिम – संजय शिरसाठ – शिवसेना
- वैजापूर – भाऊसाहेब चिकटगावकर – राष्ट्रवादी
- गंगापूर – प्रशांत बंब – भाजप
- कन्नड – हर्षवर्धन जाधव – शिवसेना
संबंधित बातम्या
औरंगाबाद लोकसभा : पाचव्या टर्मसाठी खैरेंवर मतविभाजनाची टांगती तलवार
काँग्रेसची उमेदवार यादी, औरंगाबादमध्ये सुभाष झांबड, चंद्रपुरात मुत्तेमवारांना धक्का
भाजपची तिसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील सहा उमेदवारांची नावं घोषित
लोकसभा निवडणूक : शिवसेनेची यादी जाहीर
भाजप उमेदवारांविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार कोण?
आघाडीचे 48 पैकी 36 जागांवर उमेदवार जाहीर, संपूर्ण यादी एकाच ठिकाणी
औरंगाबादेतून खैरेंविरोधात इम्तियाज जलील यांची उमेदवारी जवळपास निश्चित