दिल्लीत भाजपविरोधात काँग्रेस-आप एकवटले
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांमध्ये आता भाजपविरोधात काँग्रेस आणि आम आदमी पक्ष एकवटले आहेत. सूत्रांनुसार, नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत काँग्रेस-आप आघाडीवर शिक्कामोर्तब झाला. यामध्ये दिल्लीच्या सात लोकसभेच्या जागांचा फॉर्मुलाही तयार झाला आहे. दिल्लीच्या सात जागांपैकी चार जागांवर आप निवडणूक लढवणार आहे, तर काँग्रेस तीन जागांवर निवडणूक लढवणार आहे. सूत्रांनुसार, नवी दिल्ली, चांदनी चौक आणि […]
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांमध्ये आता भाजपविरोधात काँग्रेस आणि आम आदमी पक्ष एकवटले आहेत. सूत्रांनुसार, नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत काँग्रेस-आप आघाडीवर शिक्कामोर्तब झाला. यामध्ये दिल्लीच्या सात लोकसभेच्या जागांचा फॉर्मुलाही तयार झाला आहे. दिल्लीच्या सात जागांपैकी चार जागांवर आप निवडणूक लढवणार आहे, तर काँग्रेस तीन जागांवर निवडणूक लढवणार आहे.
सूत्रांनुसार, नवी दिल्ली, चांदनी चौक आणि उत्तर पश्चिम या जागांवरुन काँग्रेस त्यांचा उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. तसेच पूर्व दिल्ली, उत्तर-पूर्व, पश्चिम दिल्ली आणि दक्षिण दिल्ली या जागांवरुन आपचा उमेदवार निवडणूक लढवेल.
हरियाणामध्येही काँग्रेस-आप सोबती
हरियाणाच्या 10 लोकसभेच्या जागांवरही काँग्रेस-आपमध्ये बोलणी झाली आहे. इथे आपला एक जागा मिळण्याची शक्यता आहे. करणाल किंवा गुडगाव यापैकी एका जागेवरुन आप लढू शकते. हरियाणातून आपने दोन जागांची मागणी केली होती. मात्र, त्यांना एकाच जागेवर समाधान मानावे लागले.
गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस आणि आपमध्ये आघाडीसाठी बैठका, चर्चा सुरु होत्या. मात्र, माजी मुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा शीला दीक्षित आघाडीविरोधात होत्या. तर आपने काँग्रेससोबत आघाडी करण्याची इच्छा आधीच व्यक्त केली होती.
दिल्लीमध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेस-आप एकवटल्याचं चित्र आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने दिल्लीच्या सातही जागा जिंकून आणल्या होत्या. मात्र, त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकांमध्ये आप ही 70 पैकी 67 जागांवर निवडूण आली होती. आता येणाऱ्या निवडणुकांत भाजपविरोधातील काँग्रेस-आपची ही रणनिती किती यशस्वी ठरते, हे तर निवडणुकांच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.
संबंधित बातम्या :
भाजप सोडताना शत्रुघ्न सिन्हांनी उल्लेख केलेले नानाजी देशमुख कोण?
ती चूक अजाणतेपणामुळे, पार्थला फासावर लटकवणार का? : अजित पवार
पंकजांच्या बेरजेच्या राजकारणाला आणखी एक यश, धनंजय मुंडेंना धक्का
राष्ट्रवादीला मोठा धक्का, जयदत्त क्षीरसागरांचा भाजपला जाहीर पाठिंबा