राजस्थानमध्ये अशोक गहलोतच मुख्यमंत्री!

नवी दिल्ली: राजस्थान विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेससमोरचा मुख्यमंत्रीपदाचा पेच अखेर सुटला आहे. सचिन पायलट की अशोक गहलोत या नावापैकी एका नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ज्येष्ठ नेते अशोक गहलोत यांच्याच गळ्यात राजस्थानच्या  मुख्यमंत्रीपदाची माळ घातल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संध्याकाळी 4 वाजता याबाबतची अधिकृत घोषणा जयपूरमध्ये करण्यात येणार […]

राजस्थानमध्ये अशोक गहलोतच मुख्यमंत्री!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

नवी दिल्ली: राजस्थान विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेससमोरचा मुख्यमंत्रीपदाचा पेच अखेर सुटला आहे. सचिन पायलट की अशोक गहलोत या नावापैकी एका नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ज्येष्ठ नेते अशोक गहलोत यांच्याच गळ्यात राजस्थानच्या  मुख्यमंत्रीपदाची माळ घातल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संध्याकाळी 4 वाजता याबाबतची अधिकृत घोषणा जयपूरमध्ये करण्यात येणार आहे.

राहुल गांधी यांनी सचिन पायलट आणि अशोक गहलोत यांच्याशी दिल्लीत बातचीत केली. राहुल गांधी यांनी एक-एक करुन दोघांची मतं जाणून घेतली. त्यानंतर अशोक गहलोत यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगण्यात येत आहे.

राजस्थान विधानसभा निवडणुकीत 199 पैकी 99 जागा काँग्रेसने तर 73 जागा भाजपने जिंकल्या. अन्य पक्ष आणि अपक्षांना मिळून 27 जागा मिळाल्या. शिवाय सपा-बसपाने काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसने बहुमताचा आकडा आता पूर्ण केला आहे.

एकीकडे सत्ता मिळाली असताना मुख्यमंत्री कोण हा प्रश्न काँग्रेसमध्ये होता. त्यासाठी सुरुवातीपासूनच ज्येष्ठ नेते अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यात चढाओढ होती.

अशोक गहलोत हे काँग्रेसचे महासचिव आहेत, तर सचिन पायलट हे राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष आहेत. अशोक गहलोत यांनी यापूर्वीही मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं. अशोक गहलोत यांचा अनुभव मोठा असल्याने त्यांनीच मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत बाजी मारली.

सध्या दोन्ही नेते दिल्लीवरुन जयपूरला रवाना झाले. संध्याकाळी चार वाजता मुख्यमंत्रीपदाची अधिकृत घोषणा होणार आहे.

राजस्थान विधानसभा निवडणूक निकाल (199) :

  • काँग्रेस –  99
  • भाजप – 73
  • इतर – 27

कोण आहेत अशोक गहलोत?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गहलोत यांनी आतापर्यंत दोन वेळा राजस्थानचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. काँग्रेसच्या केंद्रीय संघटनेत अत्यंत महत्त्वाचं पद त्यांच्याकडे आहे. शिवाय कार्यकर्ते आणि जनतेमध्ये गहलोत यांची छाप आहे. अत्यंत कमी वयात प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या गहलोत यांच्याकडे कुशल संघटक म्हणून पाहिलं जातं.

अशोक गहलोत यांची दुसरी बाजूही आहे. कारण, राजस्थानच्या जनतेने नवा बदल म्हणून काँग्रेसला निवडून दिलंय. पण अशोक गहलोत हे नव्या बदलाचं प्रतिक ठरु शकत नाहीत असं बोललं जातं. कारण ते कित्येक दशकांपासून राजस्थानच्या राजकारणात सक्रिय आहेत. गटबाजीचा आरोपही गहलोत यांच्यावर होत असतो. शिवाय सचिन पायलट यांना काम करताना रोखल्याचा आरोपही काँग्रेसच्याच एका गटाकडून केला जातो.

कोण आहेत सचिन पायलट?

सचिन पायलट हे राजस्थानमधील काँग्रेसचे युवा नेते आहेत. खासदार असलेल्या सचिन पायलट यांनी विधानसभा निवडणूक लढवली आणि मोठ्या फरकाने ही निवडणूक जिंकली. त्यांच्याकडे गेल्या साडे चार वर्षांपासून काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद आहे. दोन लोकसभा आणि विधानसभेच्या चार पोटनिवडणुका जिंकण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

राजस्थान काँग्रेसमध्ये सचिन पायलट यांच्याकडे नव्या ऊर्जेचं प्रतिक म्हणून पाहिलं जातं. प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करताना गेल्या पाच वर्षात त्यांनी काँग्रेसची संख्या 21 वरुन 100 वर नेली आहे. असं असलं तरी सचिन पायलट हे उद्धट असल्याचा आरोपही केला जातो. त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचं पाठबळ आणि जनतेच्या पाठिंब्याची उणीव आहे.

संबंधित बातम्या :

सत्तेनंतर खुर्चीसाठी वाद, राजस्थानात काँग्रेसमधले दोन गट भिडले

मध्य प्रदेशात भाजपला काँग्रेसने नाही, ‘नोटा’ने हरवलं!

कलेक्टरची नोकरीही गेली, निवडणुकीतही पराभव

कमलनाथ की ज्योतिरादित्य शिंदे? मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री कोण?

मध्य प्रदेशातही भाजपने हात टेकले, तब्बल 15 वर्षांनी शिवराज सिंहांचा राजीनामा

मध्य प्रदेशात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण भाजपपेक्षा कमी मतं!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.