Nagpur | 4 रुपयांचा पेन 34 रु., 5000चा कुलर 59,000/-ला! स्टेशनरी घोटाळ्याचा मास्टरमाईंड कोण?
कोरोना काळात नागपूर महापालिकेला राज्य सरकारकडून 50 कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. या निधीतून पालिकेने दैनंदिन कामकाजासाठी लागणारे स्टेशनरी साहित्य खरेदी केले होतं.
नागपूर : नागपुरातील (Nagpur) महापालिकेत एक घोटाळा झाला असल्याचा आरोप करण्यात येतो आहे. स्टेशनरी घोटाळा (Stationary Scam) असं या घोटाळ्याला नाव देण्यात आलंय. काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नगरसेवक संदीप सहारे (Sandip Sahare) यांनी हा घोटाळा झाला असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे नागपूर महापालिकेत भ्रष्टाचार (Corruption) झाला असून त्याची चौकशी करण्यासाठी सत्ताधारी आणि प्रशासनानंही समित्या तयार केल्या आहेत.
स्टेशनरी घोटाळा म्हणजे काय?
चार रुपयांचा पेन 34 रुपयाला…5 हजार रुपयांचा कुलर 59 हजाराला…440 रुपयांच्या कॅल्कुलेटर 785 रुपयांना! हे दर आहेत महापालिकेत खरेदी करण्यात आलेल्या साहित्याचे. स्टेशनरीच्या या साहित्याच्या खरेदी घोटाळा झाला असल्याचा आरोप करण्याता आल्यानं या घोटाळ्याला स्टेशनरी घोटाळा असं नाव देण्यात आलंय.वर उल्लेख केलेल्या दरात नागपूर महापालिकेने याच दरात स्टेशनरी साहित्य खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. काँग्रेसचे नगरसेवक संदीप सहारे यांनी माहितीच्या अधिकारात मागितलेल्या माहितीत ही धक्कादायक बाब पुढे आली असल्याचं टीव्ही 9 मराठीशी बोलताना म्हटलंय. स्टेशनरी खरेदीतून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार महापालिकेत झालाय. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सत्तापक्ष आणि प्रशासनानं समित्या तयार केल्याय. मात्र, घोटाळ्यामुळं नागपूर महापालिका चांगलीच चर्चेत आली आहे.
कुठून समोर आली माहिती?
गेल्या काही दिवसांपासून नागपूर महापालिकेत स्टेशनरी घोटाळा गाजतोय. कोरोना काळात नागपूर महापालिकेला राज्य सरकारकडून 50 कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. या निधीतून पालिकेने दैनंदिन कामकाजासाठी लागणारे स्टेशनरी साहित्य खरेदी केले. या खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या संगनमताने झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्टेशनरीचं वेगवेगळं साहित्य चढ्या दराने खरेदी करण्यात आले आणि यात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला, असा आरोप काँग्रेसचे नगरसेवक संदीप सहारे यांनी केला आहे. माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या आकडेवारीचा आधार घेत त्यांनी हे आरोप केले आहेत.
कोणत्या खरेदीत किती भ्रष्टाचार?
कूलर 40 लिटर -खरेदी केलेली किंमत 59 हजार रुपये -बाजार भाव 8 हजार 24
कूलर 120 लिटर -खरेदी केलेली किंमत 79 हजार रुपये -बाजार भाव 8 हजार 496
डॉट पेन प्रति नग – -खरेदी केलेली किंमत 9.50 रुपये -बाजार भाव 1.95 रुपये
यू पिन प्लास्टिक कोटेड पॅकेट -खरेदी केलेली किंमत 198 -बाजार भाव 22 रुपये
प्लास्टिक फोल्डर बॅग एक नग -खरेदी केलेली किंमत 187 -बाजार भाव 10 रुपये
जेल पेन प्रति नग -खरेदी केलेली किंमत 34 रुपये -बाजार भाव 4 रुपये
टेबल रायटिंग पॅड प्रति नग -खरेदी केलेली किंमत 4 हजार 450 -बाजार भाव 1 हजार 400 रुपये
कॅशिओ कॅल्कुलेटर प्रति नग -खरेदी केलेली किंमत 785 -बाजार भाव 440 रुपये