नाशिक/मुंबई : भीमशक्ती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे काँग्रेसवर नाराज आहेत. काँग्रेसकडून आमच्यावर अन्याय होत असल्याचा आरोप हंडोरेंनी केला. त्यामुळे चंद्रकांत हंडोरे काँग्रेसला रामराम ठोकण्याची शक्यता बळावली आहे. (Congress Ex Minister Chandrakant Handore likely to quit party)
नाशिकमध्ये काल झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत ‘भीमशक्ती’च्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली. कार्यकर्त्यांकडून काँग्रेस सोडण्यावर भर दिला जात आहे.
आगामी काळात भीमशक्ती संघटना राज्यात स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं चंद्रकांत हंडोरे यांनी स्पष्ट केलं. भीमशक्ती संघटनेचं पक्षात रुपांतर करण्यावर आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
चंद्रकांत हंडोरे हे मुंबईतील चेंबूरचे माजी आमदार आहेत. त्यांनी सामाजिक न्यायमंत्री म्हणून आघाडी सरकारच्या काळात काम पाहिले होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ते महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आहेत.
हंडोरे हे गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेससोबत आहेत, मात्र सध्या ते नाराज आहेत. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत ते काँग्रेसच्या तिकीटावर रिंगणात उतरले होते, मात्र शिवेसेनेच्या प्रकाश फातर्पेकर यांच्याकडून त्यांना पराभवाचा धक्का स्वीकारावा लागला. त्यातच आता विधानपरिषदेवर वर्णी लागण्याची शक्यताही मावळल्याने हंडोरे नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कोरोनावर मात
दरम्यान, मे महिन्यात चंद्रकांत हंडोरे यांना ‘कोव्हिड’ची लागण झाली होती. 20 दिवस मुंबईतील रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांनी कोरोनावर मात केली.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यापासूनच चंद्रकांत हंडोरे चेंबुरच्या जनतेला मदत करण्यासाठी सरसावले. विशेषतः पी. एल. लोखंडे मार्ग परिसरातील जनतेच्या सर्व प्रकारच्या मदतीसाठी ते दिवसरात्र मेहनत घेतली. या कालावधीत त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. (Congress Ex Minister Chandrakant Handore likely to quit party)
हंडोरे यांच्या तीन चाचण्या कोरोना पॉझिटिव्ह आल्याने धाकधूक वाढली होती. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार करण्यात येत होते. उपचारानंतर चंद्रकांत हंडोरे यांची चौथी टेस्ट निगेटीव्ह आल्याने कार्यकर्त्यांनाही मोठा दिलासा मिळाला.
Video : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 2 November 2020https://t.co/ptYDVSyQBL
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 2, 2020
संबंधित बातम्या :
काँग्रेसचे माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांची ‘कोरोना’वर मात
(Congress Ex Minister Chandrakant Handore likely to quit party)